पंढरीच्या वारीला परवानगी नाकारल्यानेच ‘कोरोना’ पसरतोय : संभाजी भिडे बरळले

बंडातात्या कराडकर यांना मागील काही दिवसांपासून केलेल्या स्थानबद्धतेवरून आणि वारीला घातलेल्या निर्बधावरून शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे आक्रमक झालेत. बंडातात्या कराडकर यांची स्थानबद्धतेतून आज तात्काळ सुटका करा ही माझी कळकळीची प्रार्थना आणि पांडुरंगाची आज्ञा आहे.

  सांगली: आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे कायमचर्चेत असलेले संभाजी भिडे पुन्हा एकदा आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. पंढरीच्या वारीला परवानगी न दिल्यानेच राज्यात आणि देशात कोरोना पासरतोय, वारीला परवानगी द्या, जगातीलच कोरोना नष्ट होईल असे वक्तव्य शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांनी सांगली येथे माध्यमांशी बोलताना केलं आहे.

  शेकडो वर्षांची परंपरा असणाऱ्या पायी वारीला परवानगी द्यावी, ही मागणी भिडे यांनी सांगलीचे जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांच्याकडे केली आहे, त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. देशासह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे राज्यात अनेक गोष्टींवर निर्बंध लादण्यात आले आहेत. अनेक सण-उत्सव गेल्यावर्षीप्रमाणे कोरोनाच्या सावटात पार पडत आहेत. अशातच आषाढी वारीदेखील कोरोना सावटात पार पडणार आहे. पायी वारी सोहळ्यासाठी वारकरी आग्रही आहेत. परंतु सरकारनं आषाढी वारीसाठी मोजक्याच आणि मानाच्याच पालख्यांना परवानगी दिली आहे. एवढंच नाहीतर पायी वारी सोहळा न करता, बसमधून पालख्या पंढरपुरात नेण्यात येणार आहेत. परंतु, तरिही पायी वारी सोहळ्याला परवानगी मिळवण्यासाठी काही वारकरी आग्रही असल्याचं पाहायला मिळत आहे. पायी वारी सोहळ्याच्या परवानगीसाठी वारकऱ्यांकडून सुप्रीम कोर्टात याचिकाही दाखल करण्यात आली होती. अशातच आता पायी वारी सोहळ्याच्या परवानगी द्यावी .

  पंढरीची वारी झाल्यावर देशातील नव्हतेतर जगातील कोरोना आटोक्यात नाहीतर नामशेष होईल. संतांच्या परंपरा जपल्याने सगळी काही विघ्नं नाहीशी होतात. त्यामुळे पायी वारी करण्यास परवानगी द्यावी,

  संभाजी भिडे,शिवप्रतिष्ठान

  बंडातात्याच्या स्थानबद्धतेवरून संभाजी भिडे आक्रमक
  बंडातात्या कराडकर यांना मागील काही दिवसांपासून केलेल्या स्थानबद्धतेवरून आणि वारीला घातलेल्या निर्बधावरून शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे आक्रमक झालेत. बंडातात्या कराडकर यांची स्थानबद्धतेतून आज तात्काळ सुटका करा ही माझी कळकळीची प्रार्थना आणि पांडुरंगाची आज्ञा आहे असे संभाजी भिडे यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून सरकारकडे मागणी केलीय.