bullock cart race

कोणत्याही परिस्थितीत शर्यत होणारच, असा दावा आमदार पडळकर यांनी केला आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आयोजित केलेल्या बैलगाडी शर्यतीवरून वातावरण तापले आहे. आमदार पडळकर यांच्या झरे या गावी मोठा पोलीस फौजफाटा तळ ठोकून आहे. नऊ गावात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

    सांगली : बैलगाडी शर्यत होऊ नये यासाठी सरकार कामाला लागली आहे. पण, कोणत्याही परिस्थितीत बैलगाडी शर्यत होणार असा एल्गार भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. शुक्रवारी बैलगाडी शर्यत जाहीर केली आहे तर दुसऱ्या बाजूला प्रशासनाने बैलगाडी शर्यत रोखण्यासाठी मोठी तयारी केली आहे.

    पण, कोणत्याही परिस्थितीत शर्यत होणारच, असा दावा आमदार पडळकर यांनी केला आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आयोजित केलेल्या बैलगाडी शर्यतीवरून वातावरण तापले आहे. आमदार पडळकर यांच्या झरे या गावी मोठा पोलीस फौजफाटा तळ ठोकून आहे. नऊ गावात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

    बैलगाडी शर्यतीच्या आयोजनामुळे न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होऊ नये, यासाठी पोलिस प्रशासनाने आमदार पडळकर यांना नोटीस बजावली आहे.