Damage to turmeric crop due to torrential rains in Marathwada Inflows to Sangli agricultural market declined

मराठवाडा आणि विदर्भात झालेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain in Maharashtra) पिकांचे मोठे नुकसान झाल्याने सांगलीची बाजारपेठ हादरली आहे. मराठवाडा आणि विदर्भातून सांगलीच्या कृषी बाजार पेठेत( Sangli agricultural market) दाखल होणाऱ्या सोयाबीन, हळद, उडीद, मूग यांच्या आवकेवर आगामी काळात मोठा परिणाम होण्याचा अंदाज येथील व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

    सांगली : मराठवाडा आणि विदर्भात झालेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain in Maharashtra) पिकांचे मोठे नुकसान झाल्याने सांगलीची बाजारपेठ हादरली आहे. मराठवाडा आणि विदर्भातून सांगलीच्या कृषी बाजार पेठेत( Sangli agricultural market) दाखल होणाऱ्या सोयाबीन, हळद, उडीद, मूग यांच्या आवकेवर आगामी काळात मोठा परिणाम होण्याचा अंदाज येथील व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

    मराठवाडा आणि विदर्भातून मोठ्या प्रमाणावर सांगली जिल्ह्यात शेतीमाल येत असतो. सांगलीच्या बाजारात उडीद व मूगडाळीचा ७० टक्के पुरवठा हा मराठवाड्यातील आहे. मराठवाड्यातून हळदीची सरासरी दीड लाख पोती, खानदेशातून अडीच लाख पोती आवक होत असते. सांगलीच्या बाजारपेठेशी या दोन्ही विभागांचे नाते आहे. त्यामुळे मराठवाडा, विदर्भातील संकटामुळे सांगलीच्या बाजारावरही संकट दाटले आहे.

    मराठवाड्यातील सुमारे १५ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. पंचनाम्यानंतर याचे चित्र स्पष्ट होणार असले तरी सांगलीच्या बाजारात येणारा माल सुमारे ३० ते ४० टक्क्यांनी घटण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.