ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना पाठीमागील बाजूस रिफ्लेकटर बसविण्याची मागणी

इस्लामपूर (सांगली) :या परिसरात बहुतांशी साखर कारखाने असून ते सुरू झाले आहेत. पुणे-बंगळूर आशियायी महामार्ग, पेठ-सांगली राज्य महामार्गावर ऊसवाहतूक करणाऱ्या वाहनांची गर्दी वाढत आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढण्याची शक्‍यता आहे. याकरिता ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना पाठीमागील बाजूस रिफ्लेकटर लावणे गरजेचे आहे. अपघात रोखण्यासाठी प्रशासनाने रिफ्लेक्‍टर सक्ती सोबत वाहतूक शिस्तीचे पालन होत की नाही याची तपासणी करावी अशी मागणी होत आहे.

इस्लामपूर  : या परिसरात बहुतांशी साखर कारखाने असून ते सुरू झाले आहेत. पुणे-बंगळूर आशियायी महामार्ग, पेठ-सांगली राज्य महामार्गावर ऊसवाहतूक करणाऱ्या वाहनांची गर्दी वाढत आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढण्याची शक्‍यता आहे. याकरिता ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना पाठीमागील बाजूस रिफ्लेकटर लावणे गरजेचे आहे. अपघात रोखण्यासाठी प्रशासनाने रिफ्लेक्‍टर सक्ती सोबत वाहतूक शिस्तीचे पालन होत की नाही याची तपासणी करावी अशी मागणी होत आहे.

या परिसरात राजारामबापू कारखाना, सर्वोदय साखर कारखाना, हुतात्मा कारखाना, वारणा कारखाना, कृष्णा कारखान्याच्या यंत्रणेमार्फत ऊस तोडणी केली जाते. या सर्व कारखान्यात गाळपासाठी आणला जाणारा ऊस पुणे-बंगरुळ आशियायी महामार्ग व पेठ-सांगली रोड वरून वाहतूक केली जाते. ऊस वाहतूक वाहनांची गती अत्यंत कमी असते. बऱ्याचवेळा या वाहनाचा घोटाळा झाल्याने महामार्गाच्या कडेला ती उभी केलेली असतात. राष्ट्रीय महामार्गावरची वाहने अत्यंत सुसाट वेगाने जात असतात. ऊस वाहतूक करणारे वाहन मंद गतीने चालते.त्याला रिप्लेकटर लावला नसेल तर ते वाहन लांबून दिसत नाही. ते सुसाट वाहन ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनावर आदळते व अपघात घडून येतो. त्या वाहनास किंवा थांबलेल्या ऊस वाहनास जर रिप्लेकटर असेल तर तर मोठा होणारा अपघात टळू शकतो. अनेक वेळा मोठे अपघात घडलेले आहेत. या करिता कारखान्यातील ऊस वाहतूक विभागाने ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्‍टर, बैलगाडी, ट्रक रिप्लेकटर बसवणे गरजेचे आहे.ऊस वाहतूक ट्रॅक्‍टरमध्ये मोठ्या आवाजात गाणी लावली जातात. ज्या मुळे पाठीमागुण येणाऱ्या वाहनांचा हॉर्न चा आवाज त्या चालकाला ऐकू येत नाही. यामुळे अपघात प्रमाण वाढत आहे.ऊस वाहतूक वाहनवर्ती प्रशिक्षित चालक असणे गरजेचे आहे. त्यासाठी शासनाच्या वाहतूक यंत्रणेने या बाबबीकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.