सत्तेत असताना भाजपाने नैतिकता पाळली होती का? : खासदार अमोल कोल्हे 

सांगली : राष्ट्रवादीचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी आणि औरंगाबाद शहराचे संभाजीनगर करा या मागणीवरुन राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी भाजपवर शरसंधान साधले आहे.मुंडे यांच्यावर आरोप करणाऱ्यांच्याकडे कदाचित आरसे शिल्लक नसावेत,तसेच नैतिकतेची अपेक्षा करणाऱ्या विरोधकांनी सत्तेत असताना नैतिकता पाळली होती का,असा टोला लगावला आहे,ते सांगलीच्या म्हैसाळ येथे बोलत होते.

सांगली : राष्ट्रवादीचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी आणि औरंगाबाद शहराचे संभाजीनगर करा या मागणीवरुन राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी भाजपवर शरसंधान साधले आहे.मुंडे यांच्यावर आरोप करणाऱ्यांच्याकडे कदाचित आरसे शिल्लक नसावेत,तसेच नैतिकतेची अपेक्षा करणाऱ्या विरोधकांनी सत्तेत असताना नैतिकता पाळली होती का,असा टोला लगावला आहे,ते सांगलीच्या म्हैसाळ येथे बोलत होते.

मुंढे आणि औरंगाबाद वरून भाजपावर निशाणा

ग्रामपंचायत निवडणूकीच्या प्रचारार्थ सांगलीच्या म्हैसाळ याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांची सभा पार पडली आहे.यासभेच्या निमित्ताने प्रसार माध्यमांशी बोलताना खासदार कोल्हे यांनी सामजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपावरून भाजपाने केलेल्या राजीनाम्याची मागणी आणि औरंगाबाद शहराचे संभाजीनगर नामकरणवरून भाजपावर जोरदार टीका केली आहे.

आम्हाला आता शिव-शंभू भक्ती शिकवणार का ?

खासदार कोल्हे म्हणाले,महत्वाचा मुद्दा हा आहे की ,छत्रपती संभाजी महाराज हे आपल्या प्रत्येकासाठीआराध्य दैवत आहेत.आणि हा मुद्दा कोण उचलतय याचे मला अप्रूप वाटतंय.ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीला रायगडावर ढोल वाजवले, ज्यानी महाराजाच्या गडकोटावर डेस्टिनेशन वेडिंग व्हावे म्हणून जी आर काढला हे लोक आम्हाला आता शिव-शंभू भक्ती शिकवणार का ? असा संतप्त सवाल कोल्हे यांनी करत औरंगाबाद विमानतळाला संभाजीराजे यांचे नाव देण्याचा महाविकास आघाडीसरकारने केलेली मागणी स्तुत्य स्वागत करतो,मात्र 5 वर्षे सत्तेत असताना यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल काय केले, असा प्रश्न विचारले पाहिजे,असं मत कोल्हे यांनी स्पष्ट केले आहे.

सत्तेत असताना नैतिकता पाळली होती का ?

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्कार आरोपावरून भाजपा नेत्यांनी केलेल्या राजीनाम्याच्या मागणीवरुन खासदार कोल्हे म्हणाले,आरोप झाला म्हणजे तो सिद्ध होत नाही,शिवाय राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख यांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपांच्या बाबतीत स्वतः नार्को टेस्टीची मागणी केली आहे.त्यामुळे ज्यांनी आरोप केले, त्यांनी नार्को टेस्टसाठी पुढाकार घ्यावा,पण ती होत नाही,नामदार मुंडे यांनी त्यांच्याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे.पण जे विरोधक आज राजीनाम्याची मागणी करत आहेत,त्यांच्याकडे कदाचित आरसे शिल्लक नसावेत,त्यांनी जर आरशात बघितले,तर त्याच्या मागण्यां रास्त ठरतील,असे वाटत नाही,तसेच राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या राजीनाम्याची मागणी करणारे विरोधक जेवढया नैतिकतेची अपेक्षा आमच्याकडून करतायत,तेवढी नैतिकता विरोधकांनी सत्तेत असताना पाळली होती का,असा सवाल खासदार कोल्हे यांनी केला आहे.