प्रख्यात गझलकार व जेष्ठ साहित्यिक इलाही जमादार यांचं निधन

सुप्रसिद्ध गझलकार इलाही जमादार (वय ७५ )यांचे नुकतेच निधन झाले आहे... सांगली जिल्ह्यातील दूधगावात त्यांचे मुळ गाव असून त्याच गावी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून जमादार आजाराने त्रस्त होते. 

सांगली : सुप्रसिद्ध गझलकार इलाही जमादार (वय ७५ )यांचे नुकतेच निधन झाले आहे… सांगली जिल्ह्यातील दूधगावात त्यांचे मुळ गाव असून त्याच गावी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून जमादार आजाराने त्रस्त होते.

इलाही जमादार यांचा परिचय
सांगली जिल्ह्यातील वारणा काठावरील दुधगाव गावात एक मार्च १९४६ रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांनी १९६४ पासून काव्य लेखनास प्रारंभ केला. पुणे येथे ते स्थायिक झाले होते. आकाशवाणी,दूरदर्शनचे ते मान्यताप्राप्त कवी होते.त्यांच्या कविता आणि गझला राज्यातच नव्हेतर राज्याबाहेरही प्रसिद्ध आहेत.
त्यांचे “जखमा अशा सुगंधी’ आणि “महफील ए इलाही’ या नावाचे मराठी व उर्दू काव्यवाचनाचे कार्यक्रम सर्वत्र प्रसिद्ध झाले होते.गतवर्षी ते घरात किरकोळ अपघात होऊन जखमी झाले होते. त्यांना स्मृतिभ्रंशही जडला होता. आज सकाळी त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच कवी, साहित्यिक आदींनी शोक व्यक्त केला.