केसेस झाल्या तरी बेहत्तर, शुक्रवारपासून सांगलीच्या व्यापारी पेठा उघडणार ; भाजपा आमदार, खासदरांचा इशारा

सांगली जिल्ह्यात सुरू असणाऱ्या अन्यायकारक लॉकडाऊन बाबत गुरुवार २२ जुलै पर्यंत अल्टिमेटम देत आहोत, यामध्ये व्यापार चालू करा, व्यापाऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, अन्यथा आम्ही २३ जुलै रोजी व्यापाऱ्यांची दुकान व व्यापार सुरू करू प्रसंगी आमच्यावर केसेस घातल्या तरी चालतील मात्र आम्ही व्यापारी आणि सर्वसामान्य जनते सोबत त्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरत आहोत. त्यामध्ये भाजपचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते पुढे असतील.

    सांगली : सांगली जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे, हे मान्य त्यासाठी गेल्या तीन महिन्यांपासून लॉकडाऊन आहे, मात्र तरी देखील संख्या कमी झालेली नाही. आता छोटे मोठे व्यापारी यांची अवस्था अतिशय दयनीय आहे, त्यामुळे गुरुवार दि. २२ पर्यंत आम्ही सहकार्य करू, त्यानंतर आमच्यावर केसेस झाल्या तरी बेहत्तर पण आम्ही व्यापारी पेठा सुरू करणार असल्याचा इशारा भारतीय जनता पक्षाचे आमदार आणि खासदार यांनी दिला आहे.

    खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ आणि आमदार सुरेश खाडे यांनी व्यापाऱ्यांच्या बैठकी नंतर संयुक्त पत्रकार परिषद घेऊन हा इशारा दिला आहे. सांगली जिल्ह्यातील कोविड पॉझिटिव्हीटी रेट दहा टक्के पेक्षा जास्त असल्याने प्रशासनाकडून नव्याने कोणतीही सूट दिली नाही, त्यामुळे व्यापाऱ्यांनी भाजप आमदार आणि खासदार यांच्याकडे आपली भूमिका मांडली.

    यावेळी बोलताना खासदार संजय पाटील म्हणाले, सांगली जिल्ह्यात सुरू असणाऱ्या अन्यायकारक लॉकडाऊन बाबत गुरुवार २२ जुलै पर्यंत अल्टिमेटम देत आहोत, यामध्ये व्यापार चालू करा, व्यापाऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, अन्यथा आम्ही २३ जुलै रोजी व्यापाऱ्यांची दुकान व व्यापार सुरू करू प्रसंगी आमच्यावर केसेस घातल्या तरी चालतील मात्र आम्ही व्यापारी आणि सर्वसामान्य जनते सोबत त्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरत आहोत. त्यामध्ये भाजपचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते पुढे असतील.

    यावेळी सांगली शहर जिल्हा जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे म्हैशाळकर, ओबीसी मोर्चा प्रदेश सरचिटणीस मोहन व्हनखंडे, युवा मोर्चा शहर अध्यक्ष धीरज सूर्यवंशी उपस्थित होते