अभ्यासासाठी तज्ज्ञांची गरज भासते, ‘या’ विषयात चालढकल चालली आहे; चंद्रकांत पाटील

मराठा आरक्षणाकडे (the Maratha reservation) ठाकरे सरकारने (the Thackeray government) दुर्लक्ष केल्याचा पुनरूच्चार भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी पुन्हा केला आहे.  ते म्हणाले की, आम्ही अजित पवारांसोबत (Ajit Pawar) सरकार स्थापन करताना मोठी ताकद लावली तितकी या सरकारने न्यायालयात लावली नाही.

    इस्लामपूर (Islampur).  मराठा आरक्षणाकडे (the Maratha reservation) ठाकरे सरकारने (the Thackeray government) दुर्लक्ष केल्याचा पुनरूच्चार भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी पुन्हा केला आहे.  ते म्हणाले की, आम्ही अजित पवारांसोबत (Ajit Pawar) सरकार स्थापन करताना मोठी ताकद लावली तितकी या सरकारने न्यायालयात लावली नाही. सांगली जिल्ह्यातील (Sangli district) इस्लामपूर (Islampur) येथे बोलत होते. अभ्यासासाठी तज्ज्ञांची गरज भासते, या विषयात चालढकल चालली आहे, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला.

    कदाचित पत्ता चुकला असावा
    चंद्रकांत पाटील म्हणाले की, जे इतर मागासवर्गियांना सूत्र लावले ते मराठ्यांना अवलंबायला अडचण काय हे सरकारने समोर येऊन स्पष्ट करावे, असा सल्ला चंद्रकांत पाटलांनी ठाकरे सरकारला दिला. राष्ट्रवादीने पंतप्रधान नरेंद्र मोदींना १ कोटी पत्र लिहिण्याचा उपक्रम घेतला, किती हा मूर्खपणा चाललाय?. शरद पवारांनी १ कोटी पत्र उद्धव ठाकरेंना लिहायला सांगायला पाहिजेत, कदाचित पत्ता चुकला असावा, म्हणून मोदींना पत्र लिहिली जात आहेत, असा घणाघात चंद्रकांत पाटलांनी केला.

    आंदोलनात चाल ढकल मान्य नाही
    ते म्हणाले की, संभाजीराजे मान्य करत नसले तरी आम्ही त्यांना भाजपचे खासदार मानतो. लोकप्रतिनिधींना जाब विचारुन प्रश्न सुटणार आहे का बाबा, वाट बघणार आहात की वाट लागण्याची वाट पाहणार आहात? या विषयात आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत, आंदोलनात कोणी चाल ढकल करत असेल तर ते मान्य होणार नाही, असा इशारा यावेळी चंद्रकांत पाटलांनी दिला.