प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

जिल्ह्यातील कारखानदारांनी एक रक्कमी एफ आर पी देण्याचा शब्द पाळला नाही. केवळ चार कारखान्यांनी एक रक्कमी एफ आर पी दिला आहे. यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी शुक्रवारी वसंतदादा अर्थात दत्त इंडिया कारखान्याच्या गव्हाणी त उड्या टाकण्याचे आंदोलन करण्याची घोषणा केली आहे.

सांगली : जिल्ह्यातील कारखानदारांनी एक रक्कमी एफ आर पी देण्याचा शब्द पाळला नाही. केवळ चार कारखान्यांनी एक रक्कमी एफ आर पी दिला आहे. यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी शुक्रवारी वसंतदादा अर्थात दत्त इंडिया कारखान्याच्या गव्हाणी त उड्या टाकण्याचे आंदोलन करण्याची घोषणा केली आहे.

कडेगाव येथे १३ नोव्हेंबर रोजी कारखानदार आणि स्वाभिमानीचे पदाधिकारी यांची पाहिली संयुक्त बैठक झाली. या बैठकीत तोडगा निघाला नाही. त्यानंतर दुसरी बैठक १८ नोव्हेंबर रोजी झाली या बैठकीत बराच उहापोह झाल्यानंतर कारखानदारांनी एक रक्कमी एफ आर पी द्यायचे कबूल केले.

मात्र, प्रत्यक्षात सोन हिरा, उद गिरी, निणाई देवी कोकरूड आणि मोहनराव शिंदे आरग या चार कारखान्यांनी एक रक्कमी एफ आर पी दिला. मात्र, अन्य कारखान्यांनी पहिला हप्ता देवून शेतकऱ्यांची फसवणूक केली कारखानदारांनी शब्द पाळला नाही म्हणूनच या लबाड कारखानदारांचे पुतळे जाळण्याचे आंदोलन नांद्रे येथून सुरू करण्यात आले.

यानंतर आता शेतकरी गव्हाणीत उड्या टाकण्याचे आंदोलन करणार आहेत. त्याची सुरुवात वसंतदादा अर्थात दत्त इंडिया कारखान्याच्या गव्हाणी त उड्या टाकून शुक्रवारी दुपारी बारा वाजता करण्यात येणार असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.