शेतकरी भीक मागतील पण, खासदार संजय पाटील यांच्याकडू बिल वसूल करतील : महेश खराडे

खा. संजय पाटील यांच्या संपर्क कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनास बसलेले शेतकरी तासगावात घरोघरी जावून भाकरी मागून गुजराण करतील, भीक मागतील मात्र बिल मिळाल्याशिवाय हटणार नाहीत

    सांगली: सांगलीचे खासदार संजय पाटील यांनी दिलेली आश्वासने पाळली नाहीत , थकीत ऊस बिले अद्याप दिलेली नाहीत ,त्यामुळे  मंगळवार दिनांक २० जुलै पासून त्यांच्या तासगाव येथील संपर्क कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच ठिय्या मारलेले शेतकरी तासगावात घरोघरी जावून भाकरी मागतील, भीक मागून गुजराण करतील.पण, बिल मिळाल्याशिवाय हटणार नाहीत, अशी माहिती स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिली.
    तासगाव व नागेवाडी या दोन कारखान्याची ऊस बिले खासदारांनी अद्याप दिलेली नाहीत.१५ जानेवारी पर्यंतची ऊस बिले दिलेली आहेत. मात्र त्यानंतर गाळप झालेल्या उसाची बिले दिलेली नाहीत. ऊस गाळप होवून सहा महिने उलटून गेले आहेत.
    कायद्याने गाळपानंतर १४ दिवसात ऊस बिल देणे बंधनकारक असताना ही सहा महिने विलंब झाला आहे. या प्रश्नावर आम्ही स्वाभिमानीच्या वतीने तीन आंदोलने करण्यात आली प्रत्येक वेळी तारखा आणि आश्वासने देण्यात आली. पण ती पाळली नाहीत. २१ जून रोजी मोर्चा काढणार येण्यात होता. मात्र, २० जून रोजी कारखाण्याचे व्यवस्थापक आर.डी.पाटील हे चर्चेसाठी आले.सांगलीत सर्व आमच्या पदाधिकाऱ्यां बरोबर त्यांची चर्चा झाली.त्यावेळी त्यांनी चेक दाखविले आणि २१जून पासून बिल देण्यास प्रारंभ करत आहोत. असं आम्हाला सांगितले.त्यामुळे आंदोलन स्थगित करा अशी विनंती केली. त्यावेळी आम्ही सर्वांशी चर्चा करून आंदोलन स्थगित केले.मात्र त्या चर्चेला २० जुलै ला एक महिना होत आहे. मात्र बिले अद्याप मिळालेली नाहीत.त्यामुळेच येत्या २० जुलै पासून तासगाव मार्केट यार्डातील खा. संजय पाटील यांच्या संपर्क कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.

    आंदोलनास बसलेले शेतकरी तासगावात घरोघरी जावून भाकरी मागून गुजराण करतील, भीक मागतील मात्र बिल मिळाल्याशिवाय हटणार नाहीत,  असा निर्धार करण्यात आला आहे. त्याचबरोबर आर.आर.सी अंतर्गत कोणती कारवाई केली याचाही जाब तासगाव तहसीलदारांना विचारला जाईल.असं महेश खराडे यांनी सांगितले. आंदोलन यशस्वी करण्यासाठी राजेंद्र माने, अशोक खाडे दामाजी डूबल, गुलाबराव यादव, सचिन पाटील, भुजंग पाटील, संदेश पाटील, शशिकांत माने,महेश जगताप, संदीप शिरोटे, माणिक शिरोटे, शिवाजी भोसले , सिधु जाधव, प्रदीप लाड, तानाजी सागर, कुंडलिक बाबर, गणेश शिंदे,सचिन महाडिक ,अख्तर संदे , तानाजी धनवडे, सचिन चव्हाण, मुकेश चिंचवाडे,आदीसह अन्य प्रयत्न करत आहेत.