उपसरपंच निवडीवरून झालेल्या मारामारीत;  सदस्याचा खून

भाजप गटाच्या कार्यकर्त्यांनी पांडुरंग काळे यांच्यासह राष्ट्रवादीच्या ग्रामपंचायत सदस्यांच्या हल्ला चढवला. काठ्या आणि धारदार शस्त्रांनी झालेल्या मारहाणीमध्ये पांडुरंग काळे यांच्यासह राष्ट्रवादीचे ४ ते ५ जण जखमी झाले. पांडुरंग काळे यांना उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जात असताना त्यांचा मृत्यू झाला.

    सांगली :  बोरगाव   येथील उपसरपंच निवडीवरून झालेल्या मारामारीत एका ग्रामपंचायत सदस्याची हत्या झाली. गुरुवारी ही घटना घडली. पांडुरंग काळे (वय ५५) असे मयत सदस्याचे नाव आहे. या घटनेत राष्ट्रवादीचे ग्रामपंचायत सदस्यही गंभीर जखमी झाले. जखमींना सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भाजप गटाच्या कार्यकर्त्यांकडून ही हत्या झाल्याचा आरोप जखमी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी केला आहे. गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनास्थळी जिल्हा पोलीस प्रमुख दीक्षित गेडाम दाखल झाले. गावांमध्ये मोठा पोलिस बंदोबस्त सध्या तैनात करण्यात आला आहे.

    बोरगाव ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादीच्या आमदार सुमन पाटील व शिवसेनेचे नेते अजितराव घोरपडे यांच्या गटाचे ३ सदस्य निवडून आले आहेत. तर भाजपचे खासदार संजय पाटील गटाचे ८ सदस्य निवडून आलेल आहेत. गुरुवारी (िद. ४) झालेल्या उपसरपंचपदाच्या निवडणुकीत भाजप गटाच्या चार सदस्यांनी सुमन पाटील आणि घोरपडे गटाच्या पॅनेलमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. यामध्ये पांडुरंग काळे यांचाही समावेश होता.
    िनवडीच्या बैठकीला जात असताना भाजप गटाच्या कार्यकर्त्यांनी पांडुरंग काळे यांच्यासह राष्ट्रवादीच्या ग्रामपंचायत सदस्यांच्या हल्ला चढवला. काठ्या आणि धारदार शस्त्रांनी झालेल्या मारहाणीमध्ये पांडुरंग काळे यांच्यासह राष्ट्रवादीचे ४ ते ५ जण जखमी झाले. पांडुरंग काळे यांना उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जात असताना त्यांचा मृत्यू झाला. इतर जखमींना सांगलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.