जतचे माजी आमदार उमाजीराव सनमडीकर यांचे निधन

मूळचे जत तालुक्यातील सनमडी येथील रहिवाशी असलेले उमाजीराव सनमडीकर यांनी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत सातवी पर्यतचे शिक्षण पूर्ण केले. १९६२ साली सैन्य दलात दाखल झाले. शिपाई, हवालदार, नायक या पदावर काम केलेल्या सनमडीकर यांनी १९६५ च्या युद्धात सहभागी झाले होते १९७१ साली मुंबई येथे सैन्य दलातील अधिकाऱ्यांना ट्रेनिग देण्यासाठी त्यांची निवड झाली. १९७७ ते सेवेतून सेवानिवृत्त झाले.

    सांगली :  काँग्रेसचे निष्ठावंत, जतचे माजी आमदार व महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळाचे अद्यक्ष उमाजीराव सनमडीकर यांचे मंगळवारी सकाळी साडेसहा वाजता निधन झाले. सांगली येथील भारती हॉस्पिटलमध्ये त्यांना ह्रदयविकाराच्या झटका आला.माजी सैनिक ते जतचे तीन वेळा आमदार असा राजकीय प्रवास करणारे सनमडीकर यांच्या रूपाने जतला प्रथमच लाल दिव्याची गाडी मिळाली.

    मूळचे जत तालुक्यातील सनमडी येथील रहिवाशी असलेले उमाजीराव सनमडीकर यांनी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत सातवी पर्यतचे शिक्षण पूर्ण केले. १९६२ साली सैन्य दलात दाखल झाले. शिपाई, हवालदार, नायक या पदावर काम केलेल्या सनमडीकर यांनी १९६५ च्या युद्धात सहभागी झाले होते १९७१ साली मुंबई येथे सैन्य दलातील अधिकाऱ्यांना ट्रेनिग देण्यासाठी त्यांची निवड झाली. १९७७ ते सेवेतून सेवानिवृत्त झाले.

    सेवानिवृत्तीनंतर ते सनमडी गावच्या राजकारणात उतरले. ग्रामपंचायत निवडणुकीत प्रथम विजयीझाले. त्यांनी उपसरपंच पद भूषविले. १९७९ साली पंचायत समितीवर सर्वाधिक मताने विजयी झाले.राखीव झालेल्या जत विधानसभा मतदार संघासाठी कै. विजयसिंहराजे डफळे यांनीराज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्याकडे सनमडीकर यांना उमेदवारी देण्याचा आग्रह धरला. वसंतदादा पाटील यांनी त्यांचे निकटवर्तीय तत्कालीन आमदार अँड. जयंत सोहनी यांना डावलून उमाजीराव सनमडीकर यांना उमेदवारी दिली. १९८५ साली सनमडीकर हे प्रथम आमदार झाले. १९९० साली सनमडीकर हे अपक्ष आमदार म्हणून निवडून आले. १९९५ मध्ये त्यांचा पराभव झाला. २००४ साली त्यांनी पुन्हा आमदारकी पटकावली. तीन वेळा आमदार होण्याचा मान सनमडीकर यांना मिळाला. महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्षपद उमाजीराव सनमडीकर यांना मिळाले व जतला पहिल्यादाच लाल दिव्याची गाडी मिळाली.

    मागील काही दिवसापासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. मंगळवारी त्यांची प्राणज्योत मावळली.त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा दोन मुली, नातवंडे असा मोठा परिवार आहे.