माडग्याळी मेंढी खरेदीसाठी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील कोणिकोणुरमध्ये!

आमच्या तालुक्यातील कोणिकोनुर सारख्या छोट्याशा गावात माडग्याळ मेंढीचे चांगल्या पद्धतीने संवर्धन केले आहे. त्यामुळे दादांनी आज आमच्या तालुक्यात घेऊन जातिवंत माडग्याळ मेंढी ची खरेदी केली. गावचे सरपंच यांनी माजी उपमुख्यमंत्री मोहिते-पाटील यांचा सत्कार केला.

    जत : भारतीय जनता पक्षाचे नेते राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील माडग्याळ मेंढी खरेदीसाठी येथे येऊन. प्रत्यक्ष मेंढपाळांना व मेंढ्याच्या कळपात जाऊन जाऊन भेट देऊन जातिवंत सात माडग्याळ मेंढी खरेदी केल्या.

    यावेळी बोलताना विजयसिंह मोहिते पाटील म्हणाले ” कुणिकोणुर (आबाचीवडी) सारख्या छोट्याशा गावात गेली चाळीस चाळीस वर्ष माडग्याळ मेंढी चे चांगल्या पद्धतीने पैदास व संवर्धन केले जात आहे, त्यामुळे आज माडग्याळ मेंढी महाराष्ट्र ,कर्नाटक आणि आंध्र प्रदेश राज्यात चांगली मागणी होत आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी माडग्याळ मेंढी पैदास झाली त्या ठिकाणी येऊन माडग्याळ मेंढ्या खरेदी केल्या. खूप चांगल्या पद्धतीने देखण्या मेंढ्या मेंढपाळ यांनी सांभाळले आहेत.

    यावेळी बोलताना आरपीआयचे जिल्हाध्यक्ष संजय कांबळे म्हणाले “आमच्या तालुक्यातील कोणिकोनुर सारख्या छोट्याशा गावात माडग्याळ मेंढीचे चांगल्या पद्धतीने संवर्धन केले आहे. त्यामुळे दादांनी आज आमच्या तालुक्यात घेऊन जातिवंत माडग्याळ मेंढी ची खरेदी केली. गावचे सरपंच यांनी माजी उपमुख्यमंत्री मोहिते-पाटील यांचा सत्कार केला. प्रास्ताविक माजी चेअरमन ज्ञानेश्वर आटपाडकर यांनी केले.यावेळी संजय कांबळे ,अंकुश कोळकर ,नवनाथ मस्के, भारत खांडेकर, सिकंदर पटाईत, समाधान पडळकर, भानुदास राजगे ,रियाज शेख उपस्थित होते.