गणपती मंदिरासमोर भाजपतर्फे घंटानाद ; शासनाला मंदिरे सुरू करण्यास २ दिवसांचा अल्टिमेटम

आमदार गाडगीळ म्हणाले शासनाने 'कोरोना' चे कारण देऊनगेली दोन वर्षे मंदिरे बंद केली आहेत मंदिरांवर अवलंबून असणारे छोट दुकानदार यांची उपासमार होत आहे सध्या अन्य सर्व दुकाने सुरू आहेत बार, रेस्टॉरंट सुरू आहेत. मात्र केवळ मंदिरांमुळेच कोरोना होतो काय? बाजारातील गर्दी शासनाला दिसत नाही का, दोन दिवसात निर्णय न घेतल्यास राज्यभर तीव्र आंदोलन होईल.

    सांगली : बार सुरू, सर्व दुकाने सुरू, आठवडा बाजार सुरू मात्र केवळ मंदिरेच का बंद असा सवाल विचारत भाजप व अध्यात्मिक आघाडीतर्फे सोमवारी येथील श्री गणपती मंदिरासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्यातील आघाडी सरकारच्या धिक्काराच्या घोषणा देण्यात आल्या. दोन दिवसात मंदिरे खुली न केल्यास तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही देण्यात आला.

    आमदार सुधीर गाडगीळ, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे, ह.भ.प. अजयकुमार वाले, माजी आमदार नितीन शिंदे, निशिकांत शेटे, भाजप महिला आघाडीच्या शहर जिल्हाध्यक्षा अँड. स्वाती शिंदे, भाजप युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष धीरज सूर्यवंशी, पृथ्वीराज पवार, गौतम पवार, श्रीकांत शिंदे, नीता केळकर, भारती दिगडे, युवराज बावडेकर, राजेंद्र कुंभार, अविनाश मोहिते, कल्पना कोळेकर,उर्मिला बेलवलकर, दीपक माने, ओ.बी.सी. मोर्चाचे अमर पडळकर, अनुसूचित मोर्चाचे अमित भोसले व कार्यकर्ते उपस्थित होते.

    आमदार गाडगीळ म्हणाले शासनाने ‘कोरोना’ चे कारण देऊनगेली दोन वर्षे मंदिरे बंद केली आहेत मंदिरांवर अवलंबून असणारे छोट दुकानदार यांची उपासमार होत आहे सध्या अन्य सर्व दुकाने सुरू आहेत बार, रेस्टॉरंट सुरू आहेत. मात्र केवळ मंदिरांमुळेच कोरोना होतो काय? बाजारातील गर्दी शासनाला दिसत नाही का, दोन दिवसात निर्णय न घेतल्यास राज्यभर तीव्र आंदोलन होईल.

    वाले म्हणाले, मनशांती आणि समाधान मिळण्याची मंदिरे ही पवित्र स्थाने आहेत. ती बंद असल्याने कोरोना व महापुराने पिचलेली जनत अधिकच उदास झाली आहे. देव धर्मावर सातत्याने अन्याय करणान्य राज्यातील सरकारला मंदिरे खुर्ल करण्याचा इशारा देण्यासाठी आज आंदोलन केले आहे.