Gold smuggling case in Kerala; NIA raids in Sangli

सोने तस्करी प्रकरणी केरळ कस्टमकडून 15 जणांना अटक करण्यात आले होते. सोने तस्करीची व्याप्ती मोठी असल्याने याचा तपास एनआयएकडे देण्यात आला होता. एनआयएकडून 9 जून रोजी सोने तस्करीचा मुख्य सूत्रधार मोहम्मद मन्सूर याला अटक करण्यात आली आहे. तपासामध्ये मन्सूर याने 100 किलो सोने सांगली जिल्ह्यात पाठवल्याची कबुली दिली.

    सांगली : दुबईतून केरळमार्गे 100 किलो सोन्याची तस्करी सांगली जिल्ह्यात केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी एनआयएच्या पथकाकडून सांगली जिल्ह्यात छापे टाकण्यात आले आहेत. जुलै 2020 मध्ये केरळमध्ये सोने तस्करीचे प्रकरण समोर आले होते. त्यानंतर मुख्य सूत्रधाराला अटक केल्यानंतर ते 100 किलो सोने सांगली जिल्ह्यात पाठवल्याची माहिती आली आहे. त्यामुळे सांगली जिल्हा पुन्हा एकदा एनआयएच्या रडारवर आला आहे.

    सोने तस्करी प्रकरणी केरळ कस्टमकडून 15 जणांना अटक करण्यात आले होते. सोने तस्करीची व्याप्ती मोठी असल्याने याचा तपास एनआयएकडे देण्यात आला होता. एनआयएकडून 9 जून रोजी सोने तस्करीचा मुख्य सूत्रधार मोहम्मद मन्सूर याला अटक करण्यात आली आहे. तपासामध्ये मन्सूर याने 100 किलो सोने सांगली जिल्ह्यात पाठवल्याची कबुली दिली.

    एनआयए पथकाने जिल्ह्यातील खानापूर, कवठेमहांकाळ, आटपाडी आणि तासगाव तालुक्यात तपासासाठी छापे टाकण्यात आले. मन्सूरने दिलेल्या माहितीवरून हे कारवाई करण्यात आली आहे. मात्र, या कारवाईबाबत एनआयएकडून गुप्तात पाळण्यात आली आहे.

    दिल्लीमध्ये गेल्या वर्षी रेल्वे स्टेशन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सोन्याची तस्करी उघडकीस आले होते. आणि त्याचे कनेक्शन सांगलीचे असल्याची माहिती समजली होती. त्यामुळे एनआयएचे पथक पहिल्यांदा सांगली जिल्ह्यात आले होते. या पथकाकडून अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले होते. आता दुबईमधून केरळ मार्गे करण्यात आलेल्या तस्करी मध्ये ही सांगली कनेक्शन समोर आल्याने एनआयएचे पथक दुसऱ्यांदा सांगली जिल्ह्यात दाखल झाले.

    हे सुद्धा वाचा