gopichand padalkar file pettiton

सकाळी जी आरोग्यमंत्र्यांनी प्रेस घेतली होती, ती गांजा ओढून घेतली होती का ?” असा प्रश्न भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे तसेच राज्य सरकारला केला.

    सांगली : काल सकाळी राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी घोषित केलं की एक तारखेपासून आम्ही १८ ते ४५ वयोगटातील लोकांचे लसीकरण (vaccination) करणार आहोत. नंतर ४ वाजता सांगितलं की हे लसीकरण करता येणार नाही. म्हणजे हे लोक पुरते गोंधळलेले आहेत. सकाळी जी आरोग्यमंत्र्यांनी प्रेस घेतली होती, ती गांजा ओढून घेतली होती का ?” असा प्रश्न भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे तसेच राज्य सरकारला केला.

    येत्या१ मेपासून राज्यभरात कोरोना (Corona virus) प्रतिंबधात्मक लसीकरण मोहीम राबवण्यात येईल, असे राज्य सरकारने यापूर्वी सांगितले होते. मात्र, काल पत्रकारांशी बोलताना १ मे पासून पुरेशा लसींअभावी लसीकरणाची मोहीम राबवता येणार नाही असे राजेश टोपे असे सांगितले होते. त्यानंतर हाच मुद्दा घेऊन पडळकर यांनी प्रतिक्रिया दिली. ते सांगलीत पत्रकारांशी बोलत होते.

    “काल सकाळी राज्याच्या पालकमंत्र्यांनी घोषित केलं की एक तारखेपासून आम्ही १८ ते ४५ वयोगटातील लोकांचे आम्ही लसीकरण करणार आहोत. नंतर ४ वाजता सांगितलं की ते करता येणार नाही. म्हणजे हे लोक पुरते गोंधळलेले आहेत. सकाळी जी प्रेस घेतली होती, ती गांजा ओढून घेतली होती का ? यांना उठ सूट केंद्राकडे बोट दाखवायचं आहे. यांना केंद्राकडे बोट दाखवायचं आहे. मुळात विचारसरणी एक नसताना, कोणताही अजेंडा नसताना ते एकत्र आले आहेत,” असे गोपीचंद पडळकर म्हणाले.

    यावेळी पुढे बोलताना त्यांनी महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांवर सडकून टीका केली. भाजपचं राजकीय प्रस्थ समाप्त करण्यासाठी हे पक्ष एकत्र आल्याचा आरोप पडळकर यांनी केला. राज्य सरकारने या सर्वांमधून बाहेर येऊन महाराष्ट्रात कोणाचीही मृत्यू होऊ नये त्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी केली.