पालकमंत्री जयंत पाटील यांनी केली कोयना धराणाची पाहणी

सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर व नवजा येथे अनुक्रमे ५६०० व ६२०० मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे कोयना धराणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. या धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्याने कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात पूर सदृश्य स्थिती निर्माण होत आहे.

सांगली : सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील पाणी पातळीत वाढ होत आहे. त्यामुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी आज कोयना धरणाची पाहणी केली. कोयना धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने कृष्णा नदीत पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. धरणातून ५६००० क्युसेकने पाणी सोडण्यात येत आले आहे. 

सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर व नवजा येथे अनुक्रमे ५६०० व ६२०० मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे कोयना धराणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. या धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्याने कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात पूर सदृश्य स्थिती निर्माण होत आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी कोयना धरणाची पाहणी केली. आणि टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग करण्याची सूचना दिली आहे. तसेच दुष्काळी भागात विसर्ग केलेले पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

पालकमंत्री जयंत पाटील यांच्या सोबत गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई, सत्यजित पाटणकर, मुख्य अभियंता हणमंत गुणाले, कार्यकारी भियंता कुमार पाटील, कार्यकारी अभियंता राजन रेडीयार इत्यादी अधिकारी उपस्थित होते. 

गतवर्षी आजमितीस या भागात ७३००व ८३०० मिमी इतका पाऊस झाला होता. नदीपात्रात सोडलेले पाणी हे म्हैसाळ व टेंभु योजनेतून दुष्काळी भागात दिले जात आहे. नुकसान टाळण्यासाठी टप्प्याने पाणी सोडले आहे.पाऊस वाढला तर पाणी साठविणे अशक्य होईल. संभाव्य धोका टाळण्यासाठी सर्व प्रयत्न आम्ही करीत आहोत.