सहकारतपस्वी गुलाबराव पाटील जन्मशताब्दी गुरुवारी; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राहणार उपस्थित

    सांगली : सहकार क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी करणारे खासदार स्व. सहकारतपस्वी गुलाबराव पाटील यांची जन्मशताब्दी कार्यक्रम गुरुवारी (दि. १६) विधानभवन येथील मध्यवर्ती सभागृहात आयोजित केला असून या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार असल्याची माहिती पृथ्वीराज पाटील यांनी दिली.

    या कार्यक्रमात सहकारतपस्वी गुलाबराव पाटील यांच्या आयुष्यावर आधारित चित्रफीतीचे अनावरण केले जाणार आहे. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधान परिषदेचे अध्यक्ष रामराजे निंबाळकर असणार आहेत. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी केंद्रीयमंत्री सुशीलकुमार शिंदे, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, विधान परिषद विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर, संसदीय कार्यमंत्री अनिल परब आणि महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याचेही पृथ्वीराज पाटील यांनी सांगितले.

    या जन्मशताब्दी नियोजन समितीचे निमंत्रक समितीमध्ये अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण, कार्याध्यक्ष बाळासाहेब थोरात, स्वागताध्यक्ष जयंत पाटील, कार्याध्यक्ष विश्वजीत कदम, कार्यसमिती सदस्य बाळासाहेब पाटील, सतेज पाटील, शंभूराज पाटील आदी असणार आहेत.