सांगली शहरात अतिवृष्टी, तासात पुरसदृश्य पाऊस

रविवारी दिवसभर प्रचंड उकाडा होता, सायंकाळच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. पाऊस इतक्या मोठ्या प्रमाणात होता की अवघ्या तासाभराच्या पावसाने संपूर्ण सांगली शहरात पुरसदृश्य स्थिती निर्माण झाली.

    सांगली : महापुरातून नुकत्याच सवरलेल्या सांगली शहराला रविवारी रात्री पावसाने जोरदार तडाखा दिला, अवघ्या एका तासात सर्वत्र दाणादाण उडाली.

    रविवारी दिवसभर प्रचंड उकाडा होता, सायंकाळच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. पाऊस इतक्या मोठ्या प्रमाणात होता की अवघ्या तासाभराच्या पावसाने संपूर्ण सांगली शहरात पुरसदृश्य स्थिती निर्माण झाली. अनेक ठिकाणी दुकानांमध्ये, घरांमध्ये पाणी शिरले, गुंठेवारी भागात तर गुडगाभर पाणी साचले होते, तर तळमजल्यावर असणारी अनेक दुकाने पाण्याखाली गेली. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांना कोणतीही सावधानी घेता आली नसल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.