कोणतीही भीती न बाळगता अपघातग्रस्तांना तातडीने मदत करा : रोहित पवार

पोलीस चौकशीला घाबरुन अनेकदा लोक अपघातग्रस्तांना मदत करत नाहीत आणि त्यामुळे वेळीच मदत न मिळाल्याने अपघातातील जखमींचा जीव जाऊ शकतो. त्यामुळे कोणतीही भीती न बाळगता अपघातग्रस्तांना तातडीने मदत केली पाहिजे, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

सांगलीतील (Sangli) मांडवे-पिंगळी दरम्यान एका शेतकऱ्याच्या कारला अपघात झाला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवारही (Rohit Pawar) त्याचवेळी या परिसरातून जात होते. रोहित पवारांनी तात्काळ धाव घेत रस्त्याच्या खाली गेलेल्या अपघातग्रस्त कारला (Accident to Car) आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने बाहेर काढली. त्यानंतर जखमींना तातडीने उपचारासाठी नजिकच्या रुग्णालयात पाठविण्यात आले. अपघातग्रस्तांसाठी रोहित पवार देवदूत ठरले. सुदैवाने यात कोणतीही जीवीतहानी झाली नाही. पोलीस चौकशीला घाबरुन अनेकदा लोक अपघातग्रस्तांना मदत करत नाहीत आणि त्यामुळे वेळीच मदत न मिळाल्याने अपघातातील जखमींचा जीव जाऊ शकतो , असं रोहित पवार यांनी ट्विट (Tweet) करत म्हटलं आहे.

काय म्हणाले रोहित पवार

पोलीस चौकशीला घाबरुन अनेकदा लोक अपघातग्रस्तांना मदत करत नाहीत आणि त्यामुळे वेळीच मदत न मिळाल्याने अपघातातील जखमींचा जीव जाऊ शकतो. त्यामुळे कोणतीही भीती न बाळगता अपघातग्रस्तांना तातडीने मदत केली पाहिजे, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

रोहित पवार यांनी सामाजिक भान राखत अपघातग्रस्तांना केलेल्या मदतीमुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. रोहित पवार यांच्या सतर्कतेमुळे अपघातग्रस्तांना तात्काळ मदत मिळाली आहे. सोशल मीडियावर रोहित पवारांच्या या कामाचं कौतुक केलं जात आहे.