पडळकराचं वय किती पवारसाहेबांचा अनुभव किती ?

जेजुरीत अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. पुतळ्याच्या अनावरणावरुन पडळकरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका केली होती. गोपीचंद पडळकरांच्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले.

    सांगली (Sangali).  जेजुरीत अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. पुतळ्याच्या अनावरणावरुन पडळकरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका केली होती. गोपीचंद पडळकरांच्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले.

    सत्ता गेल्यानंतर भाजप अस्वस्थ झालं आहे, भाजप किती अस्वस्थ झालेलं आहे त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे पडळकरांची वक्तव्य, अशा शब्दात जयंत पाटलांनी पडळकरांचा समाचार घेतला आहे. भाजप किती खालच्या पातळीवर जाऊ शकतो, त्यांना किती फस्ट्रेशन आलं आहे हे यातून स्पष्ट होत असल्याचं जयंत पाटील म्हणाले आहेत. ते सांगलीमध्ये माध्यमांशी बोलत होते.

    पडळकराचं बोलणं हे सुसंस्कृत राजकारणाला शोभत नाही. ते नेहमीच बेताल वक्तव्य करत असतात. पडळकराचं वय किती पवारसाहेबांचा अनुभव किती. तसंच एन-केन मार्गाने प्रयत्न सुरु असल्याचं स्पष्ट होत आहे, अशा शब्दात पाटलांनी पडळकरांवर टीका केली आहे.

    दरम्यान, अहिल्याबाई होळकरांच्या पुतळ्याला शरद पवार यांच्यासारख्या भ्रष्टाचारी नेत्याचे हात लागता कामा नये, असं म्हणत पडळकरांनी पवारांवर टीका केली होती.