स्वयंपाक केला नाही म्हणून पत्नीला बॅटने मारहाण, पत्नीचा मृत्यू, पतीला अटक

सांगलीतील कुपवाडच्या अहिल्यानगर झोपडपट्टीत राहणाऱ्या राहुल बाळासो जाधव या २५ वर्षांच्या तरुणानं त्याची पत्नी कोमल जाधव (वय २१) हिला बॅटने मारहाण केली. मात्र बॅटचा घाव वर्मी बसल्याने त्यात कोमलचा मृत्यू झाला. दारुच्या नशेत हे कृत्य करणाऱ्या पती राहुलला पोलिसांनी अटक केलीय. 

    किरकोळ भांडण कसे अंगाशी येऊ शकते आणि होत्याचे नव्हते होऊ शकते, याचे उदाहरण सांगलीत घडलेल्या एका घटनेतून समोर आलंय. क्षणाचा राग आयुष्याची राखरांगोळी करू शकतो, याची प्रचिती सांगलीतील एका तरुणाला आली. पत्नीनं स्वयंपाक केला नाही, या किरकोळ कारणावरून कमालीचा राग आल्याने त्याने पत्नीला बॅटने मारहाण केली.

    सांगलीतील कुपवाडच्या अहिल्यानगर झोपडपट्टीत राहणाऱ्या राहुल बाळासो जाधव या २५ वर्षांच्या तरुणानं त्याची पत्नी कोमल जाधव (वय २१) हिला बॅटने मारहाण केली. मात्र बॅटचा घाव वर्मी बसल्याने त्यात कोमलचा मृत्यू झाला. दारुच्या नशेत हे कृत्य करणाऱ्या पती राहुलला पोलिसांनी अटक केलीय.

    आपल्याला भूक लागली असून स्वयंपाक का केला नाही, अशी विचारणा करत राहुलने कोमलला बॅटने अमानूष मारहाण केली. शिविगाळ करत तुला घरीच ठेवणार नाही, अशी धमकी दिली. कोमलने उपचारांसाठी दाखल होण्यापूर्वीच कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात राहुलविरोधात तक्रार दिली. त्यानंतर कोमलवर तातडीने उपचार सुरु करण्यात आले. उपचारादरम्यानच कोमलचा मृत्यू झाला.

    पती राहुलवर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आलीय. कुपवाड पोलीस याप्रकऱणी अधिक तपास करत आहेत.