हिंदुस्थान म्हणून जगायचं असेल तर… बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीदिनी संभाजी भिडेंचं शिवसेनेबाबत मोठे विधान

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जंयती आहे. बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्ताने शिवप्रतिष्ठान संस्थापक संभाजी भिडे गुरुजी (Sambhaji bhide) यांनी शिवसेनेबाबत मोठे विधान केले आहे. या देशाला हिंदुस्थान म्हणून जगायचं असेल तर शिवसेनाच पाहिजे असे भिडे गुरुजींनी ठणकावून सांगितले आहे. जयंतीनिमित्ताने बाळासाहेबांना अभिवादन करताना भिडेंनी शिवसेनेच्या वाटलीवरही भाष्य केले.

सांगली : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जंयती आहे. बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्ताने शिवप्रतिष्ठान संस्थापक संभाजी भिडे गुरुजी (Sambhaji bhide) यांनी शिवसेनेबाबत मोठे विधान केले आहे. या देशाला हिंदुस्थान म्हणून जगायचं असेल तर शिवसेनाच पाहिजे असे भिडे गुरुजींनी ठणकावून सांगितले आहे. जयंतीनिमित्ताने बाळासाहेबांना अभिवादन करताना भिडेंनी शिवसेनेच्या वाटलीवरही भाष्य केले.

संपूर्ण देशात शिवसेना वाढवावी अशी बाळासाहेबांची आकांक्षा होती. ‘बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा आकांक्षा पुर्ण करण्याचे काम हयात असलेल्या लोकांनी करणे गरजेचं आहे, असं संभाजी भिडे म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या फोटो नोटांवर छापण्याचे ताकद असलेला देश आपल्याला घडवायचा आहे. हे लक्षात ठेवून काम आपल्याला करायचे आहे. हे काम शिवसेनेच्या कार्यातच होणे शक्य असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.