सांगली महापालिकेत भाजपाला दे धक्का,राष्ट्रवादीचा महापौर तर उपमहापौर काँग्रेसचा

सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगर पालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने बाजी मारली आहे.शेवटच्या क्षणापर्यंत सस्पेंस राहिलेल्या या निवडणुकीत भाजपची सत्ता अखेर संपुष्टात आणत राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने महापौर आणि उपमहापौर पद भाजपाकडून हिसकावून घेतले आहे.

    सांगली भाजपाच्या नगरसेवकांनी भाजपाला कात्रजचा घाट दाखवात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या गळ्यात महापौर पदाची माळ घातला आहे.त्यामुळे सत्ताधारी भाजपाला महापालिकेतील सत्ता गमवावी लागली आहे.तर तुलनेने संख्याबळ कमी असताना देखील राष्ट्रवादीने भाजपाचा करेक्ट कार्यक्रम करत महापौर पद आपल्या पदरात पाडून घेतल्याने आहे.

    भाजपा नगरसेवकांनीच दाखवला भाजपाला कात्रजचा घाट..

    सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगर पालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने बाजी मारली आहे.शेवटच्या क्षणापर्यंत सस्पेंस राहिलेल्या या निवडणुकीत भाजपची सत्ता अखेर संपुष्टात आणत राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने महापौर आणि उपमहापौर पद भाजपाकडून हिसकावून घेतले आहे. ऑनलाइन पद्धतीने पार पडलेल्या या निवडणुकीमध्ये नाराज असलेल्या भाजपच्या चार नगरसेवकांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांना मतदान केला आहे.त्यामुळे धीरज सूर्यवंशी भाजपाचे महापौर पदाचे उमेदवार होते.त्यांचा पराभव झालेला आहे आणि अधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दिग्विजय सूर्यवंशी हे महापौरपदी विजय झाले आहेत. भाजपाचे 5 नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला या निवडणुकीत मतदान केला आहे.

    सत्ता असताना पराभव ..

    सांगली महापालिकेमध्ये गेल्या अडीच वर्षांपासून सत्ता आहे.41 अधिक दोन अपक्ष असे असल्याने भाजपाने पुन्हा विजयाचा दावा केला होता.मात्र भाजपामध्ये अंतर्गत नाराजी ही उफाळून आली होती. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी काँग्रेस सोबत नाराज भाजपा नगरसेवकांना आपल्या गळाला लावून महापौर-उपमहापौर निवडीमध्ये भाजपाचा करेक्ट कार्यक्रम केला आहे.

    भाजपाची पाच मते फुटली

    ऑनलाइन मतदान प्रक्रिया पार पडली आणि या मतदान प्रक्रियेमध्ये भाजपाच्या नगरसेवकांनी आघाडीचे  उमेदवाराला मतदान केले आहे.यामध्ये भाजपाचे विजय घाडगे,महेंद्र सावंत, स्नेहल सावंत,अपर्णा कदम,नसीमा नाईक
    या भाजपा नगरसेवकांनी राष्ट्रवादीचे महापौर पदाचे उमेदवार दिग्विजय सूर्यवंशी यांना मतदान केला.तर भाजपाचे विद्यमान उपमहापौर आनंदा देवामाने आणि नगरसेवक शिवाजी दुर्वे यांनी गैरहजर राहत मतदान केले नाही.

    पडलेली मते ..

    ७८ +१ पद रिक्त

    ७७ सदस्य.

    २ अनुपस्थित.

    राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार -दिग्विजय सूर्यवंशी – ३९

    भाजपा उमेदवार -धीरज सूर्यवंशी – ३६

    उपमहापौर निवडतीही धक्का..

    महापौरपदाच्या निवडणुकी बरोबर भाजपाला राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकडून उपमहापौर पदाच्या निवडणूकीत “दे धक्का” देण्यात आला आहे.तर भाजपाचे उपमहापौर पदाचे उमेदवार गजानन मगदूम यांना पराभव स्वीकारावा लागला आहे.राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार उमेश पाटील या ठिकाणी उपमहापौर म्हणून विजयी झाले आहेत.