आंब्यापर्यंत विषय ठीक होता पण आता… संभाजी भिडेंवर कारवाई होणार असल्याचे जयंत पाटील यांचे स्पष्टीकरण

भिडे यांनी दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बोलताना 'कोरोना हा आजार नसून तो मानसिक रोग आहे. जी माणसे कोरोनाने मेली ती जगण्याच्या लायक नव्हती', असे धक्कादायक विधान त्यांनी केले होते. त्याबाबत विचारलेल्या प्रश्‍नावर जयंत पाटील म्हणाले, 'जो माणूस आंबा खाल्याने मुले होतात, असे म्हणतो, त्याच्याबाबत काय बोलायचे? अर्थात, आंब्यापर्यंत विषय ठीक होता, मात्र त्यांनी कोरोनासारख्या गंभीर विषयाबाबत केलेले विधान धक्कादायक आहे. त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही.

    सांगली :  देशाच्या पंतप्रधानांपासून सामान्य माणसापर्यंत सर्वजण कोरोनाविरुद्ध लढा देत आहेत. अशावेळी समाजाला आणि सरकारला अडचणी निर्माण होतील, अशी विधान खपवून घेतली जाणार नाहीत. शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या वक्तव्याची तपासणी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असे पालकमंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

    भिडे यांनी दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बोलताना ‘कोरोना हा आजार नसून तो मानसिक रोग आहे. जी माणसे कोरोनाने मेली ती जगण्याच्या लायक नव्हती’, असे धक्कादायक विधान त्यांनी केले होते. त्याबाबत विचारलेल्या प्रश्‍नावर जयंत पाटील म्हणाले, ‘जो माणूस आंबा खाल्याने मुले होतात, असे म्हणतो, त्याच्याबाबत काय बोलायचे? अर्थात, आंब्यापर्यंत विषय ठीक होता, मात्र त्यांनी कोरोनासारख्या गंभीर विषयाबाबत केलेले विधान धक्कादायक आहे. त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही.

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही कोरोना झाला, मग संभाजी भिडे त्यावर ते शब्द वापरणार का? त्यांचे सारे शब्द निषेधार्ह आहेत. समाजाच्या कोरोना विरोधी प्रयत्नांमध्ये या विधानांनी बाधा आली आहे. त्याबाबत योग्य ती यंत्रणा तपासणी करून योग्य ती कायदेशीर कारवाई करेल, असे ते म्हणाले.