बेकरी चालकाची केली क्रुरपणे हत्या, सपासप वार करुन टेम्पोसह पेटवले

  • लोकांना रस्त्याचा बाजूला टेम्पोसह मृतदेह जळालेल्या अवस्थेत दिसला. जवळ जाऊन बघितल्यास गावकाऱ्यांना संजय यांचा मृतदेह अर्धा जळालेल्या अवस्थेत दिसला. या घटनेची माहिती पोलीसांना देण्यात आली असता पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

शिराळ – माढा तालुक्यात एका बेकरी चालकाची हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. पुर्ववैमनस्यातून ही हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे. या बेकरी चालकाला त्याच्या टेम्पोसह पेटवण्यात आले आहे. पुरावा नष्ट करण्यासाठी टेम्पोसह पेटवण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या घटनेबाबत टेंभूर्णी पोलीस ठाण्यात आज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव संजय मारुती काळे (५०) आहे. ते माढा तालुक्यातील शिराळा गावचे रहिवासी आहेत. संजय काळे हे खारी, टोस्ट बेकरीचे चालक होते. त्यांचा बेकरीचा व्यवसाय होता. प्राथमिक माहितीनुसार संजय काळे हे शनिवारी (२५ जुलै)ला सायंकाळी जेवण करुन घराच्या आंगणात झोपले होते. अचनाक ते मालवाहतूकचा टेम्पो घेऊन बाहेर गेले. घरी कोणालाही काही न सांगता ते निघून गेले. रविवारी (२६ जुलै) सकाळी ७च्या सुमारास टेंभूर्णी-अकलूज रोडजवळ त्यांचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळला. 

लोकांना रस्त्याचा बाजूला टेम्पोसह मृतदेह जळालेल्या अवस्थेत दिसला. जवळ जाऊन बघितल्यास  गावकाऱ्यांना संजय यांचा मृतदेह अर्धा जळालेल्या अवस्थेत दिसला. या घटनेची माहिती पोलीसांना देण्यात आली असता पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. 

पोलीस म्हणाले की, या व्यक्तीचा खुन करुन पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. संजय यांच्या चेहऱ्यावर ३ वार केल्याचे निशाण आहेत. त्यांचा कानही कापला गेला आहे. टेम्पो आणि मृतदेह जाळण्यात आल्याने शरीराचा छातीपासून वरचा भाग वाचला आहे. आणि १ हात जळाला नाही आहे. बाकी पुर्ण अंगाचा भाग जळाला आहे. पोलीसांनी मृतदेश शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पोलीसांनी गुन्हा दाखल करुन अधिक तापास सुरु केला आहे.