सांगलीत लॉकडाऊन वाढणार, जयंत पाटलांनी केला खुलासा

  • सांगली जिल्ह्यात लॉकडाऊन वाढणार असल्याचा चुकीचा मॅसेज व्हायरल होत आहे. या व्हायरल मॅसेज मध्ये सांगली जिल्ह्यात १०० टक्के लॉकडाऊन होणार असा लिहिण्यात आले आहे. या मॅसेजमध्ये पालकमंत्री जयंत पाटील तसेच जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांचा नावाचा उल्लेख केला आहे.

सांगली – सांगली जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी २१ जुलै पर्यंत लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे २१ जुलै नंतर लॉकडाऊन वाढणार की शिथील होणार याबाबत जनतेत संभ्रम निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील जनतेमध्ये लॉकडाऊन वाढणार आहे की नाही याबद्दल कुणकुण लागली आहे.

सांगली जिल्ह्यात लॉकडाऊन वाढणार असल्याचा चुकीचा मॅसेज व्हायरल होत आहे. या व्हायरल मॅसेज मध्ये सांगली जिल्ह्यात १०० टक्के लॉकडाऊन होणार असा लिहिण्यात आले आहे. या मॅसेजमध्ये पालकमंत्री जयंत पाटील तसेच जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांचा नावाचा उल्लेख केला आहे. 

यावर पालकमंत्र्यानी वक्तव्य करुन या व्हायरल मॅसेज बाबत खुलासा केला आहे. पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले की, सांगलीत १०० टक्के लॉकडाऊन या मॅसेजमध्ये काही तथ्य नाही. सोशल डिस्टंन्सिंगचे नियम पाळा, तसेच प्रशासनाने दिलेले निर्णयाचे पालन करा असे म्हणाले. तसेच लॉकडाऊन करु नये आणि शासनाच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करण्याचे अवाहन केले आहे. व्हायरल मॅसेजवर कोणीही विश्वास ठेवू नये असे देखील त्यांनी सांगितले आहे.