bullock died

कृष्णा सायमोते आणि त्यांच्या कुटुंबियांनी सहा फूट उंच आणि दहा फूट लांब तसेच जवळपास एक टन वजन असलेल्या गज्याला आपल्या घरातील सदस्यांप्रमाणे वाढवले होते. मालकाला कर्जमुक्त करणारा बैल अशी गज्या बैलाची(Gajya Bull Died) ख्याती होती.

    सांगली : महाराष्ट्रातील सर्वात मोठा बैल(Biggest Bull OF Maharashtra) म्हणून गिनीज बुकात स्थान मिळवलेला  सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील कसबे डिग्रज येथील गज्या बैलाने अखेरचा श्वास घेतला आहे.

    कृष्णा सायमोते आणि त्यांच्या कुटुंबियांनी सहा फूट उंच आणि दहा फूट लांब तसेच जवळपास एक टन वजन असलेल्या गज्याला आपल्या घरातील सदस्यांप्रमाणे वाढवले होते. मालकाला कर्जमुक्त करणारा बैल अशी गज्या बैलाची ख्याती होती.

    गजाच्या मृत्यूनंतर परिवाराला दु:ख अनावर झाले. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमधील कृषी प्रदर्शनात विशेष आकर्षण राहिलेल्या गज्याने आजवर अनेक पुरस्कार मिळवलेले आहेत. त्याच्या अवाढव्य शरीरयष्टी, देखणेपणा आणि वजनामुळे जन्म बैलाचा पण देह मात्र हत्तीचा असलेल्या गज्याला कृषी प्रदर्शनात मोठी मागणी असायची. गजा बैलाने या माध्यमातून मालक सायमोते यांना कर्जमुक्त केले होते. त्यांच्या कुटुंबियांनी त्याला न विकता त्याचा शेवटपर्यंत सांभाळ केला. काल बुधवारी दुपारी त्याचा हृदयविकाराने मृत्यू झाला.

    कृष्णा सायमोते यांनी त्यांच्या घरच्या शेतात गज्यावर अंत्यसंस्कार केले. गज्याच्या अकाली जाण्याने कसबे डिग्रजसह तमाम बैलप्रेमींनी हळहळ व्यक्त केली. प्रचंड देह असलेल्या गजाच्या हाडांचा सापळा संग्रहालयात ठेवण्यासाठी शास्त्रीयदृष्ट्या प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.