मराठ्यांनी आरक्षणासाठी एकत्र येणे गरजेचे : समरजितसिंह घाटगे

सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारने ज्या पद्धतीने बाजू मांडायची होती, ती मांडली गेली नाही. तसेच मराठा आरक्षणासाठी राज्यात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने झालेल्या आंदोलनातील आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे अद्याप मागे घेण्यात आलेले नाही, ते गुन्हे मागे घेतली पाहिजेत. तसेच आज मराठा आरक्षणाबाबत मागासवर्गीय आयोग स्थापन आणि फेर याचिका दाखल करण्यासाठी सरकारवर दबाव असला पाहिजे. त्यासाठी मराठा समाजाने एकत्र आले पाहिजे

    सांगली : मराठा आरक्षणासाठी सरकारवर दबावा आणण्यासाठी मराठा समाजाने आता एकत्र येण्याचे आवाहन शाहू जनक घराण्याचे वंशज समरजित घाटगे यांनी केले आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यामध्ये सरकार कमी पडल्याचा आरोपही समरजित घाटगे यांनी केला आहे. सांगलीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

    बोलताना समरजित घाटगेसरकारवर दबावासाठी एकत्र व्हाराज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत आहे. आरोप-प्रत्यारोप सुरू झालेले असून वातावरण चांगलेच तापले आहे. मराठा आरक्षणावरून खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारला अल्टिमेटम दिला आहे. दुसऱ्या बाजूला संभाजीराजे यांच्या पक्षातील नेते आणि शाहू जनक घराण्याचे वंशज समरजीत घाटगे यांनीही मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पश्चिम महाराष्ट्र संपर्क दौरा सुरू केला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाजातल्या सर्व नेते आणि समाजाला एकत्र करण्यासाठी समरजीत घाटगे यांचा दौरा सुरू झाला आहे. मंगळवारी (दि. १ जून) सांगलीत समरजित घाटगे यांनी जिल्ह्यातील मराठा समाजातील प्रमुख संघटन, नेत्यांची बैठक घेऊन सर्व समाजाने मराठा आरक्षणासाठी आता एकत्र आले पाहिजे, अशी हाक दिली आहे.आरक्षण देण्यात सरकार कमी पडतय.

    बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना समरजीत घाटगे म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत राज्य सरकार कुठेतरी कमी पडलेला आहे. कारण सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारने ज्या पद्धतीने बाजू मांडायची होती, ती मांडली गेली नाही. तसेच मराठा आरक्षणासाठी राज्यात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने झालेल्या आंदोलनातील आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे अद्याप मागे घेण्यात आलेले नाही, ते गुन्हे मागे घेतली पाहिजेत. तसेच आज मराठा आरक्षणाबाबत मागासवर्गीय आयोग स्थापन आणि फेर याचिका दाखल करण्यासाठी सरकारवर दबाव असला पाहिजे. त्यासाठी मराठा समाजाने एकत्र आले पाहिजे, ही आपली भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच समाजातील जे २ हजार १८५ विद्यार्थी एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. त्यांना तातडीने नियुक्ती पत्र दिली पाहिजे, या प्रमुख मागण्या घेऊन आपण मराठा समाजाच्या संघटना, नेते, कार्यकर्ते अशा सर्वांना एकत्र येऊन आता मराठा आरक्षणाचा लढा देण्याचे आवाहन करत असल्याचा समरजीत घाटगे यांनी स्पष्ट केला आहे.