तासगाव-सांगली रस्त्यावरील कोल्ड स्टोरेजला भीषण आग, अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल

तासगाव-सांगली रस्त्यावरील श्री कृपा ॲग्रोटेक कोल्ड स्टोरेजला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. ही घटना आज (गुरूवार) पहाटेच्या सुमारास घडली.

    तासगाव: तासगाव-सांगली रस्त्यावरील श्री कृपा ॲग्रोटेक कोल्ड स्टोरेजला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. ही घटना आज (गुरूवार) पहाटेच्या सुमारास घडली. कोल्ड स्टोरेजला आग लागल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

    या घटनेची माहिती अग्निशमन दलाला मिळाली असता, अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु आग नेमकी कशाने लागली हे समजू शकले नाही.

    दरम्यान, अग्निशमन दलाच्या गाड्या आग विझवण्याचा प्रयत्न करत असून कोल्ड स्टोरेजमधून धुराचे लोट बाहेर येत आहेत.