मिरज : कोरोना रुग्णालयात ऑक्सिजन टँकला गळती

मिरज कोरोना रुग्णालयात अतिगंभीर असलेल्या रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. त्यांना ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी ६ हजार लिटरचे तीन द्रव टँक उभारण्यात आले आहेत. बुधवारी रात्री यापैकी एका टँकमधून ऑक्सिजन गळती सुरू झाली. टँकजवळ असलेल्या कर्मचार्‍यांनी याबाबत रुग्णालय प्रशासनाला तातडीने माहिती दिली. त्यानंतर संबंधित टँकमधून असणारा ऑक्सिजन पुरवठा थांबवून अन्य दोन ऑक्सिजन टँकमधून पुरवठा सुरू करण्यात आला.

    सांगली :येथील मिरज कोरोना रुग्णालयातील ऑक्सिजन प्लँटला बुधवारी रात्री उशिरा अचानक गळती लागली. सुदैवाने रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी अन्य दोन ऑक्सिजन टँक असल्याने मोठा अनर्थ टळला. टँकची गळती काढून तो पुन्हा कार्यान्वित करण्यात आला. गळतीचे नेमके कारण समजू शकले नाही.

    अचानक घडलेल्या या घटनेमुळे जिल्हा, महापालिका प्रशासन आणि रुग्णालय प्रशासनाची एकच तारांबळ उडाली. जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, रुग्णालय अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, महापालिकेचे अधिकारी, मुख्य अग्निशमन अधिकारी चिंतामणी कांबळे हे तातडीने हजर झाले. त्यांनी तातडीने केलेल्या उपाययोजनांमुळे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सुमारे १५०  हून अधिक रुग्णांचे प्राण वाचले.

    मिरज कोरोना रुग्णालयात अतिगंभीर असलेल्या रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. त्यांना ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी ६ हजार लिटरचे तीन द्रव टँक उभारण्यात आले आहेत. बुधवारी रात्री यापैकी एका टँकमधून ऑक्सिजन गळती सुरू झाली. टँकजवळ असलेल्या कर्मचार्‍यांनी याबाबत रुग्णालय प्रशासनाला तातडीने माहिती दिली. त्यानंतर संबंधित टँकमधून असणारा ऑक्सिजन पुरवठा थांबवून अन्य दोन ऑक्सिजन टँकमधून पुरवठा सुरू करण्यात आला.

    मुंबई, नाशिक येथील रुग्णालयातील दुर्घटनेमुळे तात्काळ यंत्रणा गतीमान करण्यात आली. मिरज कोरोना रुग्णालयात बुधवारी रात्री झालेल्या ऑक्सिजन गळती प्रकरणी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, अधिष्ठाता डॉ. नणंदकर, महापालिका प्रशासन, अग्निशमन विभागाच्या अधिकार्‍यांनी तातडीने हालचाली करून गळती थांबवियाचा प्रयत्न केल्याने अनेक गंभीर रुग्णांचे प्राण वाचले. गळती तातडीने आटोक्यात आल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.दरम्यान टँकमधून होणारी गळती थांबविल्याने ऑक्सिजन पुरवठ्यावर कोणातही परिणाम झाला नसल्याने जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी सांगितले.