दुर्दैव ! राष्ट्रीय खेलो इंडिया पदक विजेती कुमारी संजना बागडी रोजंदारीवर मजुरी करण्याची वेळ

एक पैलवान तयार होत असताना किती तरी वर्ष तपश्चर्या करावी लागते. महत्त्वाचे म्हणजे त्यात सातत्य लागते, एक - एक दिवस महत्वाचा असतो, सरावासाठी , म्हणूनच सर्व नियम पाळून मास्क,सनिटारायजन, वारंवार हात स्वच्छ धुणे,सोशल डिस्टंन्स, यामध्ये स्वंयशिस्त महत्वाचीहे सर्व पाळुन कोरोनाला हद्दपार करायची ताकद पण पैलवानच करु शकतो. लाॅकडाउन शीथिल झाले आहे, पैलवानांना व्यायाम ,सराव करायला तालमी, कुस्ती केंद्र सरकारने सुरू करावित अशी मागणी होत आहे.

    सांगली : कोरोनाने सर्वत्र आहाकार माजवला आहे. सर्व सामान्या पासून सर्वच त्रस्त झालेले असल्याने माणसा-माणसातील अंतर वाढल्याने नात्यांची गरिमा संपून चालली आहे, लाॅकडाऊन मुळे सर्वजन घरी आहेत आणि याचा फटका सर्वांनाच बसू लागलेला आहे. गोरगरींबापासून श्रीमंता पर्यंत याची झळ पोहोचू लागली आहे, मग त्यातून पैलवानच कसा अपवाद राहील ! गेली दोन वर्ष कोरनामुळे कुस्त्यांची मैदाने झालेली नाहीत, महाराष्ट्र केसरी, इतर कुस्ती स्पर्धा झालेल्या नाहीत, विविध शासनाच्या स्पर्धा नाही, त्यामुळे मिळणारे मानधन नाही, विविध क्षेत्रातील दानशूर मंडळी आहेत त्यांच्या देणगीवर पैलवानकी चालते पण ; त्यांचीपण मदत मिळणे कठीण झाले आहे.

    व्यायाम शाळा ओस पडू लागल्या, तालमीमध्ये मेहनतीने घुमण्याचा आवाज यायचा आणि छड्डूचा कडाडण्याचा आवाज बंद झाला, मग अशावेळी पैलवानाने करायचं तर काय ?आपणास सर्व सोंग करता येतात पण पैशाचं सोंग करता येत नाही,मग करायचं काय मिळेल ते काम मिळेल ते करून जेवणाची सोय करावी लागत आहे. त्यापैकी तुंग येथील कुमारी संजना खंडु बागडी गरीब भटक्या विमुक्त समाजातील मच्छीमारीचा व्यवसाय करून वडील खंडु बांगडी, आजोबा नाथा बागडी ,भाऊ, घरातील सर्व मंडळी मच्छीमारीचा व्यवसाय करून मुलीला पैलवान बनवत आहेत. ती आत्ता १२वीत शिकत आहे. संजना आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच उत्तमराव पाटील कुस्ती केंद्र कवलापूर येथे कुस्ती कोच उत्तमराव पाटील, दीपक पाटील, सुहास पाटील ,यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे.

    तुंग ते कवलापुर दररोज २५ की. मी प्रवास उन्हाळा, हिवाळा, पावसाळ्यात सरवाला येत असते आणि त्यासाठी दररोज १०० रुपये खर्च येतो, तीने राज्यस्तरीय संघटनेच्या, शासकीय, शालेय स्पर्धा, सुवर्ण पदक, आणि ओपन मध्ये होणाऱ्या कुस्त्या मध्ये , भारतीय कुस्ती महासंघाचे च्या स्पर्धेत , कास्य पदके,खेलो इंडिया कास्य पदके घेतली आहेत.

    मच्छीमारीचा व्यवसाय करून चार पैसे मिळत होते, ते पण बाजार बंद, घरात खर्चाला मिळणाऱ्या पैशाची पंचायत अशा परिस्थितीत तिला पैशासाठी लोकांच्या बांधावर रोजंदारीवर ३०० रुपये वर जाण्याची वेळ आली आहे. ही व्यथा एकट्या संजनाची नाही, अश्या कितीतरी पैलवान मुला, मुलींच्या, पुढे प्रश्न आ वासून उभा आहे. आजची युवा ,युवती पैलवान कुस्ती क्षेत्रातील उद्याच भविष्य महाराष्ट्र, पर्यायाने भारताच आहे.

    एक पैलवान तयार होत असताना किती तरी वर्ष तपश्चर्या करावी लागते. महत्त्वाचे म्हणजे त्यात सातत्य लागते, एक – एक दिवस महत्वाचा असतो, सरावासाठी , म्हणूनच सर्व नियम पाळून मास्क,सनिटारायजन, वारंवार हात स्वच्छ धुणे,सोशल डिस्टंन्स, यामध्ये स्वंयशिस्त महत्वाचीहे सर्व पाळुन कोरोनाला हद्दपार करायची ताकद पण पैलवानच करु शकतो. लाॅकडाउन शीथिल झाले आहे, पैलवानांना व्यायाम ,सराव करायला तालमी, कुस्ती केंद्र सरकारने सुरू करावित अशी मागणी होत आहे.