अहिल्यादेवी जयंती दिवशी धनगर आरक्षणाचा जागर करणार , घरोघरी जयंती साजरी करण्याचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे Video द्वारे आवाहन

३१ मे रोजी चौंडी येथे आपण दरवर्षी लाखोंच्या संख्येत उपस्थित राहतो, यावर्षी आपल्याला कोरोनामुळे उपस्थित राहता येणार नाही, मी त्या दिवशी आहिल्यादेवींना अभिवादन करण्यासाठी चौंडी येथे जाणार असून तो कार्यक्रम लाईव्ह केला जाणार आहे, यामध्ये आपण सहभागी व्हावे, व स्वतःच्या घरातच आहिल्यादेवींची जयंती साजरी करावी असे आवाहन त्यांनी व्हिडीओ मध्ये केलं आहे.

    सांगली : धनगर आरक्षणाचा लढा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे, मात्र अद्याप आपल्याला अपेक्षित यश आले नाही. महाविकास आघाडीला आरक्षण आणि धनगर समाजासाठी १ हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यासाठी भाग पाडू, त्यासाठी ३१ मे रोजी अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त धनगर आरक्षणाचा जागर करून घरोघरी जयंती साजरी करण्याचे आवाहन भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी एका व्हिडीओद्वारे केले आहे.

    या व्हिडीओमध्ये आमदार पडळकर यांनी पिवळा फेटा, खांद्यावर घोंगडे, हातात काठी आणि सोबत मेंढरं घेऊन पारंपरिक धनगर वेशभूषा करून परंपरांचे जतन करण्याचेही आवाहन केलं आहे.

    ते म्हणाले, २०१८ मध्ये धनगर आरक्षणाचा मोठा लढा झाला, यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी न्यायालयात धनगड आणि धनगर एकच समाज असल्याचे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केले होते.धनगर समाजाला ‘एसटी’ चा दाखला मिळेपर्यंय एक हजार कोटींची तरतूद केली. मात्र त्यानंतर सत्तेत आलेल्या महाविकास आघाडीने याबाबत कोणतीही हालचाल केलेली नाही. एकही योजना धनगर समाजासाठी आणली नसल्याचा आरोपही आमदार पडळकर यांनी केला आहे.