महापुरामुळे सांगली जिल्ह्यातील तब्बल ‘इतक्या’ लोकांचे स्थलांतर

    सांगली / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पूरपट्यातील नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात येत आहे. आत्तापर्यंत 22 हजार 467 कुटुंबातील 1 लाख 5 हजार 683 व्यक्तींचे स्थलांतर करण्यात आले आहे. तसेच लहान व मोठी अशा एकूण 24 हजार 1 जनावरांचेही स्थलांतर करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.

    जिल्ह्यात पूरस्थितीमुळे पूर्णत: बाधित 11, अंशत: बाधित 83 अशी एकूण 94 गावे बाधित आहेत. यामध्ये मिरज तालुक्यात महानगरपालिका क्षेत्रात अंशत: 1 गाव बाधित आहे. मिरज ग्रामीणमध्ये 2 गावे पूर्णत: तर 2 गावे अंशत: अशी 4 गावे बाधित आहेत. अप्पर सांगली (ग्रामीण) मध्ये 15 गावे अंशत: बाधित आहेत. वाळवा तालुक्यात वाळवा क्षेत्रातील 2 गावे पूर्णत: व 27 गावे अंशत: अशी एकूण 29 गावे बाधित आहेत. अपर आष्टा क्षेत्रातील 1 गाव पूर्णत: व 7 गावे अंशत: अशी एकूण 8 गावे बाधित आहेत. शिराळा तालुक्यात 1 गाव पूर्णत: तर 13 गावे अंशत: अशी एकूण 14 गावे बाधित आहेत. तर पलूस तालुक्यातील 5 गावे पूर्णत: व 18 गावे अंशत: अशी एकूण 23 गावे बाधित आहेत.

    स्थलांतरित व्यक्तींमध्ये मिरज तालुक्यातील महानगरपालिका क्षेत्रातील 1237 कुटुंबामधील 5 हजार 160 व्यक्ती, मिरज ग्रामीण क्षेत्रातील 307 कुटुंबातील 2 हजार 207 व्यक्ती, अपर सांगली ग्रामीणमधील 4 हजार 272 कुटुंबातील 17 हजार 385 व्यक्तींचे स्थलांतर करण्यात आले आहे. वाळवा तालुक्यातील वाळवा क्षेत्रातील 7 हजार 918 कुटुंबातील 39 हजार 590 व्यक्तींचे तर अपर आष्टा क्षेत्रातील 793 कुटुंबातील 3 हजार 634 व्यक्तींचे स्थलांतर करण्यात आले आहे. शिराळा तालुक्यातील 1085 कुटुंबातील 4 हजार 686 व्यक्तींचे, पलूस तालुक्यातील 6 हजार 855 कुटुंबातील 33 हजार 21 व्यक्तींचे स्थलांतर करण्यात आले आहे.

    यामध्ये जनावरांचे मिरज तालुक्यातील महानगरपालिका क्षेत्रातील 250, मिरज ग्रामीण क्षेत्रातील 1 हजार 219, अपर सांगली ग्रामीण क्षेत्रातील 3 हजार 604, वाळवा क्षेत्रातील 5 हजार 397, अपर आष्टा क्षेत्रातील 1 हजार 73, शिराळा तालुक्यातील 2 हजार 869, पलूस तालुक्यातील 9 हजार 589 जनावरांचे स्थलांतरण करण्यात आले आहे. वाळवा तालुक्यातील 5 जनावरे तसेच पेठ येथे 5 हजार व कामेरी येथे 12 हजार कोंबड्या मयत झाल्या आहेत. अपर आष्टा तहसील क्षेत्रात 1 जनावर, शिराळा तहसिल क्षेत्रात 4 जनावरे, पलूस तहसील क्षेत्रात 3 जनावरे व 300 कोंबड्या अशा एकूण 13 जनावरांची व 17 हजार 300 कोंबड्यांची जीवितहानी झाली आहे.