पूर्ववैमनस्यातून हरिपूर येथे डोक्यात दगड घालून युवकाचा खून

हरिपूर (मिरज) येथे पूर्ववैमनस्यातून विक्रम वाघमारे या वीटभट्टी कामगाराचा डोक्यात दगड घालून खून (Murder in Sangli) करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास घडली. सांगली ग्रामीण पोलीसांनी या ठिकाणी काही संशयितांना ताब्यात घेतले आहे.

    सांगली : हरिपूर (मिरज) येथे पूर्ववैमनस्यातून विक्रम वाघमारे या वीटभट्टी कामगाराचा डोक्यात दगड घालून खून (Murder in Sangli) करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास घडली. सांगली ग्रामीण पोलीसांनी या ठिकाणी काही संशयितांना ताब्यात घेतले आहे.

    याबाबत अधिक माहिती अशी की, मयत विक्रम वाघमारे आणि पिंगळे यांच्यात पूर्वीचा वाद होता. या वादातून न्यायालयीन खटलाही उभा राहिला आहे. हा खटला मागे घ्या म्हणून विक्रम वाघमारे शनिवारी दुपारी दारूच्या नशेत पिंपळे यांच्या घरासमोर जाऊन दंगा करत होता. त्यातून वाद होऊन वाघमारे यांचा खून करण्यात आला आहे.

    ही घटना घडल्याची समजताच सांगली ग्रामीण पोलिसांचे पथक त्या ठिकाणी दाखल झाले. त्यांनी काही संशयितांना ताब्यात घेतले. तर वाघमारे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी वसंतदादा सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.