
सांगली : हौसेला मोल नाही याची प्रचिती देणारा सोहळा सांगलीत पार पडला आहे. एका घोडीचं बारसे मोठ्या थाटामाटात पार पडले आहे.
आपण आज पर्यंत अनेक सोहळे पाहिले असतील. पण, हा सोहळा लक्षवेधी ठरला आहे. सांगलीतील मिरज तालुक्यातील सचिन शिरगुप्पे यांच्या सोनू या घोडीला एक गोंडस पांढरा शुभ्र घोडी जन्मास आली. या घोडीचा नामकरण सोहळा आज मोठ्या थाटात संपन्न झाला. या घोडीचे ‘कल्याणी’ असं नाव ठेवण्यात आले.
यावेळी केक कापून एखाद्या लग्ना सारखे जेवणाची पंगती मांडून अगदी थाटात हा सोहळा संपन्न झाला. या वेळी मोठ्या संख्येने पाहुणे मंडळींनी हजेरी लावली.