पुराच्या पाण्यातून होडी चालवत नवरदेवाने नवरीसह साधला गृहप्रवेशाचा मुहूर्त

नेटकऱ्यांनीही या व्हिडिओ ला या चांगलीच पंसती दिली असून अनेकांनी हा व्हिडीओ शेअर करत त्याला सांगलीचे स्पिरीट असून,आलेल्या संकटावर सकारात्मकतेने मार्ग काढला जातो असेही म्हटले आहे.

    सांगली: महाराष्ट्रात पावसाने धुमाकूळ घातला असून , महाराष्ट्राच्या अनेक भागात पूर आला आहे. त्यातच कृष्णेच्या महापुराने वेढले होते. पण या महापुरात
    लग्नाचा मूहूर्त चुकू नये. यासाठी चक्क लग्न आटपून पुराच्या पाण्यातून होडी चालवत नवरीचा गृहप्रेवश आटपून घेतला. घरा जवळ पाणीआठ -दहा फूट पाणी असल्याने होडीतून गृहप्रवेश करत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

    नेटकऱ्यांनीही या व्हिडिओ ला या चांगलीच पंसती दिली असून अनेकांनी हा व्हिडीओ शेअर करत त्याला सांगलीचे स्पिरीट असून,आलेल्या संकटावर सकारात्मकतेने मार्ग काढला जातो असेही म्हटले आहे.