आता आम्ही नियम मोडले, शेतकऱ्यांसाठी जे काय भोगायचंय ते भोगू : सदाभऊ खोत

आमदार सदाभाऊ खोत म्हणाले की, इतके निर्बंध लावून देखील शर्यतीचे मैदान पार पडले. मोठा जनसमुदाय आणि बैलप्रेमी या शर्यतीसाठी उपस्थित राहिला, यावरून शर्यत सुरू व्हावी ही किती आग्रही मागणी आहे हे लक्षात येते. आता नियम मोडले म्हणून जरी आमच्यावर गुन्हे दाखल झाले तरी ते गुन्हे आनंदाने स्वीकारू, असंही ते म्हणाले.

    सांगली : सरकारच्या आणि पोलिसांच्या नाकावर टिच्चून भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि त्यांच्या समर्थकांनी बैलगाडा शर्यत पार पाडली आहे. कोणत्याही परिस्थितीत बैलगाडा शर्यत होऊ देणार नाही नाही, असा चंग शासन आणि प्रशासानाने बांधला होता. तर काहीही झालं तरी शर्यत पार पडणारच, असा निर्धार पडळकर यांनी बोलून दाखवला होता. अखेर आज सकाळी पहाटे पाच वाजता पडळकर समर्थकांनी बैलगाडा शर्यतीचं आयोजन करुन शासन आणि प्रशासनाला कात्रजचा घाट दाखवला.

    दरम्यान आमदार सदाभाऊ खोत म्हणाले की, इतके निर्बंध लावून देखील शर्यतीचे मैदान पार पडले. मोठा जनसमुदाय आणि बैलप्रेमी या शर्यतीसाठी उपस्थित राहिला, यावरून शर्यत सुरू व्हावी ही किती आग्रही मागणी आहे हे लक्षात येते. आता नियम मोडले म्हणून जरी आमच्यावर गुन्हे दाखल झाले तरी ते गुन्हे आनंदाने स्वीकारू, असंही ते म्हणाले.