सांगली महापालिकेच्या परवानग्या आता एका क्लिकवर…

    सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेकडून विविध ऑनलाईन सेवांचा शुभारंभ महापौर दिग्विजय सुर्यवंशी आणि मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या हस्ते करण्यात आला.

    यावेळी विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, गटनेते विनायक सिंहासने, महिला बालकल्याण सभापती गीतांजली ढोपे-पाटील, नगरसेविका स्वाती शिंदे, माजी उपमहापौर विजय घाडगे, उपायुक्त राहुल रोकडे, सहायक आयुक्त अशोक कुंभार, पाणी पुरवठा अधीक्षक काका हलवाई आदी उपस्थित होते. महापालिकेचे सिस्टीम मॅनेजर नकुल जकाते, अतुल बसर्गी, प्रदूमन जोशी यांनी या ऑनलाईन सेवा तयार करण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत.

    महापालिकेच्या ऑनलाईन सेवेच्या माध्यमातून आता जन्म-मृत्यू दाखले, नाट्यगृह बुकिंग, होर्डिंग परवानगी, घरपट्टी पाणीपट्टी थकबाकी नसल्याचा दाखला , विवाह नोंदणी अर्ज, घरपट्टी पाणीपट्टी , मालमत्ता बिल भरणा आता एका क्लिकवर करता येणार आहे. यासाठी महापालिकेच्या https://smkc.gov.in/या लिंकवर जाऊन सुलभतेने सर्वप्रकारचे ऑनलाईन दाखले, परवानग्या मिळवता येणार आहेत. या सेवेमुळे नागरिकांचा वेळ वाचणार आहे. शिवाय त्यांची गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे. महापालिकेच्या सर्व ऑनलाईन सेवांचा नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन महापौर दिग्विजय सुर्यवंशी आणि आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले आहे.