सांगलीत बंद पेट्रोल पंपाच्या टाकीतून आले पेट्रोल बाहेर

संजयनगर येथे विरुपक्ष पेट्रोलपंप गेल्या अनेक महिन्यापासून बंद आहे. आज सकाळी या टाकीच्या व्हॉल्व्ह मधून पेट्रोल बाहेर येत असल्याने खळबळ उडाली. तेथील महापालिका कर्मचाऱ्यांनी याची माहिती अग्निशमन विभागाला दिली. त्यानंतर मुख्य अग्निशमन अधिकारी चिंतामणी कांबळे हे आपल्या ताफ्यासह तातडीने दाखल झाले.

    सांगली :  सांगलीतील संजयनगर येथे बंद पेट्रोल पंपाच्या टाकीतून पेट्रोल बाहेर येत असल्याने मनपा अग्निशामक विभागाने तातडीने धाव घेऊन पेट्रोल बाजूला करणेचे काम सुरू करण्यात केले.सांगलीच्या संजयनगरमध्ये बंद असलेल्या पेट्रोल पंपाच्या टाकीतून पेट्रोल बाहेर येत असल्याने एकच भीतीचे वातावरण निर्माण झाले. याची माहिती मिळताच मनपा अग्निशामक विभागाने तातडीने धाव घेऊन खबरदारीच्या सर्व उपाययोजना केल्या. तसेच पेट्रोल बाजूला करण्याचे काम सुरू करण्यात आले.

    संजयनगर येथे विरुपक्ष पेट्रोलपंप गेल्या अनेक महिन्यापासून बंद आहे. आज सकाळी या टाकीच्या व्हॉल्व्ह मधून पेट्रोल बाहेर येत असल्याने खळबळ उडाली. तेथील महापालिका कर्मचाऱ्यांनी याची माहिती अग्निशमन विभागाला दिली. त्यानंतर मुख्य अग्निशमन अधिकारी चिंतामणी कांबळे हे आपल्या ताफ्यासह तातडीने दाखल झाले.

    यावेळी व्हॉल्व्ह आणि आजूबाजूची पाहणी करीत पेट्रोल वरती कसे येत असावे याबाबत तपासणी सुरू करण्यात आली. याचबरोबर भारत पेट्रोलियमच्या अधिकाऱ्यांना सुद्धा पाचारण करण्यात आले आहे. संजयनगर पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. पेट्रोल बाहेर येऊ लागल्याने परिसरात खळबळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.