मराठा आरक्षणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार : जयंत पाटील

अलमट्टीबाबत बंगळूरुमध्ये होणार बैठक -सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील संभाव्य पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आणि अलमट्टी धरणातून पाणी सोडण्याबाबतच्या नियोजनासाठी पुढच्या आठवड्यात कर्नाटक राज्याची मंत्र्यांसोबत बंगळुरूत बैठक होणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली आहे.

    सांगली : मराठा आरक्षणाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करण्याबाबत प्रयत्न सुरू असल्याची माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे. तसेच संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर अलमट्टी पाणी नियोजनबाबत कर्नाटक राज्याच्या मंत्र्यासोबत बंगळूरु याठिकाणी बैठक होणार असल्याची माहितीही मंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे. ते सांगलीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

    मराठा आरक्षणाला सगळ्यात स्तरातून समाजातून वेगळ्या संघटनांकडून पाठिंबा मिळालेला आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयात याबाबत वेगळा निर्णय झाला. मात्र राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असून आता दिल्लीमध्ये संसदेत याबाबत चर्चा आणि आवाज होणे गरजेचे आहे. त्यामुळे राज्य सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांना मराठा आरक्षण देण्यासाठी आग्रह करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.