‘रात कली एक ख्वॉब में आई’… जयंत पाटील यांच्या गायकीचा व्हिडिओ होतोय व्हायरल

सांगली : जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचा एक व्हिडिओ सध्या जास्तच व्हायरल होतोय. संगीतप्रेमी असलेले जयंत पाटील सुरेल स्वरात गातात याची कल्पना कोणाला नव्हती. कोल्हापूर येथे पुतण्याच्या लग्नसोहळ्यापूर्वी रंगलेल्या हळदीच्या कार्यक्रमात जयंत पाटील यांनी किशोर कुमार यांचे एक गाणे गाऊन याची झलक दिली.

‘बुढ्ढा मिल गया’ या चित्रपटातील किशोर कुमार यांनी गायलेले ‘रात कली एक ख्वॉब में आई’ हे गाणे त्यांनी सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. कोल्हापूर येथील महासैनिक दरबार हॉलमध्ये ‘संगीत संध्या’ कार्यक्रम आयोजित केला होता.मैफील रंगल्यानंतर आप्तेष्टांनी जयंतरावांना एखादे आवडीचे गाणे सादर करण्यास सांगितले. त्यावेळी अंतरा व कडवे आठवत असलेले किशोर कुमार यांचे गीत त्यांनी सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. त्यांचा हा व्हिडिओ आप्तेष्टांसह समर्थक, कार्यकर्त्यांनी व्हायरल केला. त्याला अनेकांनी दाद दिली.