सांगली जिल्ह्यात विक्रमी लसीकरण; एका दिवसात ३६,७३४ नागरिकांना लस

    सांगली : गेल्या काही दिवसांपासून सांगली जिल्ह्यात कोरोना लसीकरणाचा वेग मंदावला होता. मात्र, शुक्रवारी दिवसभरात जिल्ह्यात विक्रमी लसीकरण झाले आहे. एकाच दिवसात जिल्ह्यातील 36 हजार 734 नागरिकांना लस मिळाली आहे.

    लसीकरणाचा वेग वाढवला पाहिजे आशा सूचना वारंवार सगळीकडून येत असताना, लसींची उपलब्धता नसल्याने प्रशासन देखील काही करू शकत नव्हते, मात्र राज्य शासनाकडून सांगली जिल्ह्याला गउरुवारी रात्री ५८ हजार कोव्हिशिल्ड लसींचा पुरवठा झाला होता, त्यामुळे लसीकरणाचा वेग वढवणे शक्य झाले.

    सांगली जिल्ह्यात शुक्रवारी एका दिवसात विक्रमी 36 हजार 734 जणांचे लसीकरण झाले आहे. मोठ्या प्रमाणावर लसींचा साठा आल्याने जिल्ह्यातील लसीकरण मोहिमेला वेग घेता आला.