रस्त्यावर उतरून मंदिरांची कुलुपं तोडायला हवीत, संभाजी भिडे यांचे वादग्रस्त विधान

कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या निर्बंधांवरून शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी सरकारवर टीका केली आहे.

    देशभरात कोविडमुळे एकीकडे लोकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत तर दुसरीकडे कोरोना हे थोतांड असल्याचं वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं आहे. मुळात कोरोना वगैरे काही नाही असं सांगत कोरोनाच्या नावाखाली लॉकडाउन करणं चुकीचं असल्याचं देखील संभाजी भिडे यांनी म्हटलं आहे.

    “या कोरोनामुळे आज देशात काय घडलं असेल तर लोकांमध्ये फक्त भीतीच आणि घबराटीचे वातावरण निर्माण झालं आहे. या वारीला जर बंदी घातली नसती तर देशात एकही उदाहरण मिळालं नसतं की कोरोनामुळे व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. माझं मत आहे की कोरोना हे षडयंत्र आहे. देशाचे हे दुर्देव आहे.”

    “पंढरपूरच्या वारीला बंदी घातल्यानंतर वारकऱ्यांनी रस्त्यावर उतरायला पाहिजे होतं. एकादशी दिवशी बंदी घातली जाते त्यावेळी मंदिरांची कुलूप तोडून मंदिर उघडी करायला पाहिजेत.” असं संभाजी भिडे यांनी म्हटलं आहे.

    दरम्यान, कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या निर्बंधांवरून शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी सरकारवर टीका केली आहे.