सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचा बिगुल वाजला : २१ नोव्हेंबरला मतदान, उद्यापासून अर्ज विक्री सुरू

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पंचवार्षिक निवडणूकीचा बिगुल अखेर वाजला आहे, बँकेसाठी २१ नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून उद्या १४ ऑक्टोबर पासून अर्ज विक्रीला सुरुवात होणार आहे. त्यादृष्टीने राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे.

  सांगली : सर्वांचे लक्ष लागून राहिलेली सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पंचवार्षिक निवडणूकीचा बिगुल अखेर वाजला आहे, बँकेसाठी २१ नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून उद्या १४ ऑक्टोबर पासून अर्ज विक्रीला सुरुवात होणार आहे. त्यादृष्टीने राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. जिल्हा बँकेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक नीळकंठ करे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा बँकेत निवडणूक कार्यालय असणार आहे.

  सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या २१ संचालक पदांसाठी ही निवडणूक होईल. प्राथमिक कृषी पत पुरवठा विकास सेवा सहकारी संस्था, संयुक्त शेती संस्था तसेच अधिकोष सह. संस्था यांचे प्रतिनिधी, जिल्हयातील प्रत्येक तालुक्यास एक याप्रमाणे मतदार प्रतिनिधी १०, तर राखीव मधून महिला प्रतिनिधी २,अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती सदस्य प्रतिनिधी १, इतर मागासवर्गीय सदस्य प्रतिनिधी १, विमुक्त जाती, भटक्या जमाती अथवा विशेष मागास प्रवर्ग सदस्य प्रतिनिधी १ आणि उर्वरित प्रतिनिधी वर्गातून इतर शेती संस्था १, कृषि पणन संस्था व शेतीमाल प्रक्रिया संस्था मतदार प्रतिनिधी १, नागरी बँका/नागरी पतसंस्था/ग्रामीण बिगरशेती पत संस्था/पगारदार नोकरांच्या पतसंस्था मतदार प्रतिनिधी २, इतर संस्था मतदार प्रतिनिधी व व्यक्ती, सभासद २ असे एकूण २१ संचालक निवडून जातील.

  असा आहे निवडणूक कार्यक्रम
  -नामनिर्देशनपत्रे दाखल करण्यासाठीचा दिनांक : १४/१०/२०२१ ते दि. २२/१०/२०२९ (स.११.०० ते दु.३.००)
  -नामनिर्देशन पत्रांची यादी प्रसिध्द करणे : १४/१०/२०२१ ते दि. २२/१०/२०२९ (जसजसे प्राप्त होतील त्याप्रमाणे रोज दु.४.०० नंतर)
  -नामनिर्देशन पत्रांच्या छाननीचा दिनांक व वेळ : २५/१०/२०२९ (स.११.०० वा. पासून छाननी संपेपर्यंत )
  -वैद्य नामनिर्देशन पत्राची यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक : २६/१०/२०२९ स.१९.०० वा.
  -उमेदवाराने नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचा दिनांक :
  २६/१०/२०२१ ते दि. ९/११/२०२१ (स.११.०० ते दु.३.००)
  -उमेदवारांना निशाणीचे वाटप व अंतिम यादीचे प्रकाशन : दि.१०/११/२०२१ स.९.०० वा.
  -ज्या दिनांकास घेण्यात येईल तो दिनांक, वेळ व मतदानाचे स्थळ : दि.२२/११/२०२१ स.८.०० ते सायं. ५.०० वा. पर्यंत (ठिकाण नंतर जाहीर करण्यात येईल)
  -मतमोजणीचा दिनांक, वेळ व स्थळ : २३/११/२०२१ स.८.०० ते मतमोजणी संपेपर्यंत सतत (ठिकाण नंतर जाहीर करण्यात येईल)
  -मतदान निकाल : मतमोजणी नंतर लगेच