सांगली : तासगावच्या पूर्व भागात बस्तवडे गावाजवळील डोंगरात भीषण स्फोट! एकाचा मृत्यू तर २ जण गंभीर जखमी

सांगली : सांगली (Sangli) जिल्ह्यातील तासगावमध्ये (Tasgaon) डोंगर फोडुन सपाटीकरण चालू असताना कॉंप्रेसर गाडीचा स्फोट झाल्याने एकाचा जागेवरच मृत्यू झाला आहे. या स्फोटात दोन जण गंभीर जखमी झाले असून दोन वाहनं जळून खाक झाल्याचं समजते.अग्निशमन दलाकडून आग विझवण्यचे काम सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.

तासगावपासून जवळच असलेल्या बस्तवडे गावात ही घटना घडली आहे. डोंगर फोडण्याचा काम सुरू असताना जिलेटीन कांड्याचा स्फोट झाला. घटनास्थळी अग्निशमन गाड्या आणि पोलीस दाखल झाले आहेत.मिळालेली माहिती अशी की, तासगावच्या पूर्व भागात बस्तवडे गावाजवळील डोंगर फोडताना भीषण स्फोट झाला. डोंगर फोडून सपाटीकरणाचं काम सुरू असताना जिलेटीन कांड्यांचा स्फोट झाला.

अचानक ट्रक पेटल्यामुळे शेजारी असलेल्या कॉंप्रेसर गाडीला आग लागली. आग भीषण असल्यानं काँप्रेसरचा ब्लास्ट झाला. त्यापाठोपाठ दोन वाहन जळून खाक झालीत. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले असून विझवण्याचं काम सुरू आहे.