अहो आश्चर्यम् ! सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील आयसेरा ; बायोलॉजीकल कंपनीने शोधली अँटी कोविड लस !!

इंजेक्शन संशोधनासाठी शेकडो प्रयोग करण्यात आले आहेत. इंजेक्शन तयार झाल्यानंतर त्याचा प्राण्यांवर प्रयोग करण्यात आला.त्या चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. आता मानवाच्या शरीरात ही लस टोचून चाचणी करण्यासाठी परवानगी मिळवण्याची प्रक्रिया सुरु आहे.या इंजेक्शनला तातडीने परवानगी मिळाल्यास देशाला मोठा दिलासा मिळणार आहे.

    समीर मुजावर, कोल्हापूर : जगभरात मृत्यूचे तांडव घालणाऱ्या कोरोनावर सांगली जिल्हातील शिराळा तालुक्यातील आयसेरा बायोलाॅजिकल कंपनीने अँटीकोविड सिरम नावाची लस शोधली आहे.त्यामुळे कोरोना रुग्णांना आता चांगलाच दिलासा मिळणार आहे.कारण या लसीचे एक किंवा दोन इंजेक्शन दिल्यानंतर रुग्ण ठणठणीत बरा होऊ शकतो असा दावा कंपनीने केला आहे.या इंजेक्शनची प्राण्यावरील ट्रायल पूर्ण झाली असून आता मानवाच्या शरीरात ही लस टोचून कोरोना वर कशी मिळवायची यासाठी फक्त आयसीएमआरच्या परवानगीची प्रतिक्षा आहे.

    कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी वेगवेगळ्या लसी आल्या मात्र कोरोनावर उपचार करण्यासाठी औषधे उपलब्ध नसल्याने जगाची परवड सुरु आहे. लस संशोधनात आणि लस निर्मितीत पश्चिम महाराष्ट्रातील पुण्याने बाजी मारली.त्यानंतर आता कोरोनावर इंजेक्शन निर्मिती करुन पश्चिम महाराष्ट्रातील सांगलीने जगाला मोठा दिलासा दिला आहे. संर्पदंश, विंचू, रेबिज यावर अत्यंत प्रभावी औषध निर्मिती केल्यानंतर आता सांगलीतील शिराळा येथील आयसेरा बायोलाॅजिकल कंपनीने कोरोनावर इंजेक्शन तयार केले आहे. या कंपनीची नाॅलेज पार्टनर पुण्याची सिरम इन्सिटीट्यूट आहे.

    हे इंजेक्शन संशोधनासाठी शेकडो प्रयोग करण्यात आले आहेत. इंजेक्शन तयार झाल्यानंतर त्याचा प्राण्यांवर प्रयोग करण्यात आला.त्या चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. आता मानवाच्या शरीरात ही लस टोचून चाचणी करण्यासाठी परवानगी मिळवण्याची प्रक्रिया सुरु आहे.या इंजेक्शनला तातडीने परवानगी मिळाल्यास देशाला मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे हातकणंगलेचे लोकसभा मतदार संघाचे खासदार धैर्यशील माने त्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करत आहेत.

     

    या इंजेक्श्नचे तीन लाख डोस सध्या तयार आहेत. आयसीएमआरची परवानगी मिळाली की याचे उत्पादन वाढवण्यात येणार आहे अशी माहिती आयसेरा बायोलॉजीकल कंपनीचे संचालक डॉ.दिलीप कुलकर्णी यांनी दिली.