vishwajeet kadam

अपघातात मंत्री विश्वजीत कदम सुखरूप आहेत. मात्र त्यांच्यासोबत असलेले दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. अंकलखोप हा त्यांचा मतदारसंघ आहे. याचठिकाणी ते गाडीतून या भागाची पाहणी करत होते. मात्र समोर आलेल्या व्यक्तीला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचा ताबा सुटल्याने गाडी रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाली.

    सांगली : कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम सांगली येथील अंकलखोप याठिकाणी २७ जुलै रोजी पूरग्रस्त भागाचा दौरा करण्यासाठी गेले होते. या ठिकाणी जात असताना गाडीसमोर व्यक्ती आल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि विश्वजीत कदम यांची गाडी रस्त्याच्या पलीकडे जाऊन अपघात झाला.

    या अपघातात मंत्री विश्वजीत कदम सुखरूप आहेत. मात्र त्यांच्यासोबत असलेले दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. अंकलखोप हा त्यांचा मतदारसंघ आहे. याचठिकाणी ते गाडीतून या भागाची पाहणी करत होते. मात्र समोर आलेल्या व्यक्तीला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचा ताबा सुटल्याने गाडी रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाली.

    या ठिकाणी त्वरित मदतकार्य पोहचले असून जखमी पोलिसांना सांगली येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे मंत्री विश्वजीत कदम यांचा हा दौरा अपूर्णच राहिला. दरम्यान ते सुखरूप असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.