Black money

एका व्यक्तीनं मित्राच्या मदतीनं स्वतःच्या दुकानावर डल्ला (Robbery in own shop) मारून पोलिसांत चोरी झाल्याची तक्रार (Theft Complaint) दाखल केली आहे.

  सांगली : सांगलीSangli) जिल्ह्यातील शिराळा(Shirala) याठिकाणी एका व्यक्तीनं मित्राच्या मदतीनं स्वतःच्या दुकानावर डल्ला (Robbery in own shop) मारून पोलिसांत चोरी झाल्याची तक्रार (Theft Complaint) दाखल केली आहे.

  या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी तक्रारदार व्यक्तीला अटक (arrest) करून चोरीचा बनाव उघड केला आहे. पोलिसांनी १७ लाख ७० हजारांच्या मुद्देमालासह आरोपी व्यक्तीला गजाआड केलं आहे. याप्रकरणी चौकशी केली असता पोलिसांनी चोरीचा बनाव रचण्यामागच्या नेमक्या कारणाचा खुलासा केला आहे.

  जयंतीलाल ओसवाल असं अटक केलेल्या व्यावसायिकाचं नाव असून त्याचं शिराळा-चांदोली रस्त्यावर शेडगेवाडी फाटा या ठिकाणी स्वतःच्या मालकीचं अंबिका स्टील नावाचं दुकान आहे. या दुकानातून तो सळई, सिमेंट, फरशी यासह बांधकामाचे विविध साहित्याची विक्री करतो. मागील बऱ्याच वर्षांपासून त्याचा हा व्यवसाय आहे. तो आपला भाऊ प्रकाश ओसवालसोबत एकत्रित कुटुंबात राहतो. दरम्यान भाऊ प्रकाश याला नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी काही पैशांची आवश्यकता होती.

  आरोपी जयंतीलालनं आपल्या भावाला नवीन व्यवसायासाठी १७ लाख ७० हजार रुपये द्यायचे ठरवले. पण त्याला हे पैसे भावाला द्यायचे नव्हते, म्हणून त्यानं ६ जुलैच्या मध्यरात्री आपल्याच दुकानात चोरीचा कट रचला. आपल्या एका मित्राच्या मदतीनं दुकानातील १७ लाख ७० हजार रुपये लंपास केले. यानंतर आरोपीनं दुसऱ्या दिवशी चोरीचा बनाव रचत पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पण चोरीची रक्कम मोठी असल्यानं पोलिसांनी याप्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतली. त्यासाठी श्वान पथक देखील आणलं. पण श्वानपथक आरोपीच्या आसपासच घुटमळतं होतं.

  तसेच पोलिसांना आरोपी जयंतीलालच्य काही हालचाली संशयास्पद वाटल्या. त्यामुळे पोलिसांनी त्याची चौकशी केली. आरोपी तक्रारदाराने उडवाउडवीची उत्तरं द्यायला सुरुवात केली. पण पोलिसांनी प्रश्नांचा भडीमार केल्यानं जयंतीलालनं आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.

  याप्रकरणी पोलिसांनी १७ लाख ७० हजार रुपयांच्या मुद्देमालासह आरोपीला अटक केली आहे. लहान भावाला नवीन व्यवसायासाठी पैसे द्यायचे नसल्यानं त्यानं स्वतःच्या दुकानात चोरी घडवून आल्याचं पोलीस चौकशीत समोर आलं आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.