म्हणून किरीट सोमय्या निघाले सांगलीला…

नुकतेच शिवसेना नेते अनिल परब यांच्याविरोधात सोमय्या यांनी मोहीम हाती घेतली आहे. परब यांची ईडी कडून देखील चौकशी करण्यात आली आहे, त्यानंतर आता भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी परब यांची सचिव बजरंग खरमाटे यांच्याकडे आपला मोर्चा वळवला आहे.

    सांगली : भाजपचे माजी खासदार किरिट सोमय्या हे नेहमीच विरोधकांचे भ्रष्टाचार बाहेर काढत असतात, अशाच एका प्रकरणात संपत्तीची पाहणी करण्यासाठी किरीट सोमय्या आज सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.

    नुकतेच शिवसेना नेते अनिल परब यांच्याविरोधात सोमय्या यांनी मोहीम हाती घेतली आहे. परब यांची ईडी कडून देखील चौकशी करण्यात आली आहे, त्यानंतर आता भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी परब यांची सचिव बजरंग खरमाटे यांच्याकडे आपला मोर्चा वळवला आहे.खरमाटे हे सांगली जिल्ह्यातील आहेत. किरीट सोमय्या हे खरमाटे यांच्या संपत्तीची माहिती घेऊन पाहणी करण्यासाठी स्वतः सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असल्याचे त्यांनी ट्विट करून सांगितले आहे.

    या ठिकाणी करणार पाहणी
    त्यांच्या ट्विट मध्ये त्यांनी ” उद्या मी सांगली येथील अनिल परब यांचे सचिव बजरंग खरमाटे यांची बेनामी संपत्ती पाहण्यासाठी जात आहे, तासगाव येथील फार्म हाऊस, चिखलहोळ येथील पाईप फॅक्टरी, बेडग येथील १५० एकर जमीन आणि कुपवाड एमआयडीसी येथील पाच एकर जमीन येथे जात आहे” असं म्हंटले आहे.